Agriculture news in marathi Due to heavy rains in Kolhapur, rivers left the basin | Agrowon

कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी पात्र सोडले 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात राहिल्याने जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पात्रात मोठी वाढ झाली. एका रात्रीत बहुतांश नद्यांचे पाणी पाच ते दहा फूट पाणी वाढल्याने नदीकाठावरील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. 

कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात राहिल्याने जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पात्रात मोठी वाढ झाली. एका रात्रीत बहुतांश नद्यांचे पाणी पाच ते दहा फूट पाणी वाढल्याने नदीकाठावरील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. 

पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी नदीवरील पाणी उपसा सुरू होता. परंतु दोन दिवसांत दहा फुटांपेक्षा जास्त पाणी वाढल्याने उपसा पंप काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. पाणी गतीने वाढत असल्याने नदीकाठावरील नागरिकांची चिंता वाढली आहे. 

पश्चिमेकडील तालुक्यात बुधवारी (ता. ४) दिवसभर तुफानी पाऊस सुरू होता. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू झाला असून त्याचा फायदा खरीप पिकांना होणार आहे. गगनबावडा तालुक्‍यात गेल्या चोवीस तासांत तब्बल तीनशे दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अनेक नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. 

दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वदूर पाऊस सुरू होता. यामुळे जिल्ह्यातील तब्बल ९० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेची पातळी ३५ फूट इतकी नोंदली गेली. पाणी इशारा पातळीजवल जवळ येण्यास फक्त सहा फूट इतकेच अंतर राहिले आहे. दरम्यान सर्वच धरण क्षेत्रात तुफान बॅटिंग सुरू असून यामुळे धरणाचे पाणी वेगात वाढत आहे. धरणात ८४ टक्के पाणीसाठा झाला आहे. जोरदार पावसामुळे दोन दिवसांत धरणात एक टीएमसी पाण्याची वाढ झाली. राधानगरी धरणातून १४०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

पंचगंगा नदीवरील-शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- शिरगाव, राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे व तारळे, वारणा नदीवरील-चिंचोली, माणगाव व कोडोली, कुंभी नदीवरील- शेणवडे, मांडुकली, सांगशी, असळज, सांगरूळ व कळे, धामणी नदीवरील- सुळे, अंबर्डे, पनोरे, गवशी, म्हासुर्ली व शेळोशी, कासारी नदीवरील- कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ तिरपण, ठाणे आवळे व यवलुज, वेदगंगा नदीवरील-निळपण, वाघापूर, शेणगाव, गारगोटी, म्हसवे, कुरणी, सुरूपली, बस्तवडे, चिखली व शेलोली, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी, सुळकुड व दत्तवाड, हिरण्यकेशी नदीवरील-साळगाव, ऐनापूर, गिजवणे, निलजी, सुळेराव, दाभीळ, हरळी, देवडे, खणदाळ व चांदेवाडी, ताम्रपर्णी नदीवरील-कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड व माणगाव, घटप्रभा नदीवरील-पिळणी, बिजुरभोगोली, हिंडगाव गवसे, कानडी सावर्डी, अडकूर व तारेवाडी, तुळशी नदीवरील- घुंगुरवाडी, कांचनवाडी, बाचणी, आरे, बीड, भाटणवाडी व चांदे, कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगांव, सरूडपाटणे, बालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे हे बंधारे पाण्याखाली आहेत. 

बुधवारी सकाळी ११ वाजताच्या अहवालानुसार जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ५ राज्यमार्ग व ९ प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण १४ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली. 

बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला तालुकावार पाऊस (मिलिमीटर) मध्ये हातकणंगले- ३८.३८ , शिरोळ- २५.८६ , पन्हाळा- ८८.२९ , शाहूवाडी- ६४ , राधानगरी- १०२.५० , गगनबावडा-३१७ करवीर- ७०.२७ , कागल- ९०.२९ गडहिंग्लज- ५५ भुदरगड-७२.४० (८५६.६०), आजरा- ११६ चंदगड- १५५.


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...