Agriculture News in Marathi Due to heavy rains Loss of millions of sugarcane growers | Page 2 ||| Agrowon

वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 ऑक्टोबर 2021

संततार पाऊस, वादळाचा रुद्रापूर, कोपरा, परसोडा शिवारातील ऊस पीकाला फटका बसत लाखो रुपयांची हानी झाली आहे. या नुकसानीचे सर्व्हेक्षण करुन भरपाई मिळावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा रुद्रापूर, कोपरा, परसोडा शिवारातील ऊस पीकाला फटका बसत लाखो रुपयांची हानी झाली आहे. या नुकसानीचे सर्व्हेक्षण करुन भरपाई मिळावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

जिल्ह्यातील काही भागात सिंचनाच्या सुविधा असून, त्या भरवशावर शेतकऱ्यांद्वारे व्यवसायीक व नगदी पिके घेतली जातात. आर्णी तालुक्‍यातील शेतकरी उसाची देखील लागवड करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. त्यासोबतच सोसाट्याचा वारा देखील सुटत असल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस आडवा झाला आहे. रुद्रापूर शिवारातील आरुष मारबते यांनी दहा एकरावर उसाची लागवड केली आहे. वादळामुळे त्यातील सहा एकरावरील उसाचे नुकसान झाले. पाच ते सहा लाख रुपयांची हानी यामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले.

परसोडा शिवारातही ऊस उत्पादकांना वादळाचा फटका बसला. छाया अरुण कदम यांचा पाच एकरावर ऊस आहे. यातील अडीच एकर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले. अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. कोपरा शिवारात तुळशीराम भायमारे यांच्या शिवारालगत असलेल्या नाल्याला पूर आल्याने त्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या पाचपैकी दीड एकरातील ऊसाला फटका बसला. या नुकसानीची प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

प्रतिक्रिया 

माझ्या शेतालगत असलेल्या नाल्याला पूर आल्यामुळे कपाशी, सोयाबीन व उसाचे नुकसान झाले. प्रशासनाकडून अद्याप सर्व्हेक्षण व पंचनामा करण्यात आला नाही. त्या संदर्भाने आदेश व्हावे, अशी मागणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाकडून ही बाब किती गांभीर्याने घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे. 
तुळशीराम भायमारे, शेतकरी, कोपरा, ता. आर्णी. 
 


इतर ताज्या घडामोडी
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६०...मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने...
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात...
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली...मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा,...
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक...
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४...सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्यावरून...उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरूनाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा...
रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५०...रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील...
शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटीलकऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी...
जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता...
कापसाला यंदा दर; मात्र उत्पादकतेत मोठी...अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही...
विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय...नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने...
अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी...अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व...
सरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात...परभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून...
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी तीन...
शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये घेऊन...गोवर्धन, जि. नाशिक : गिरणारे येथील एका...
राज्यात दुधाच्या गुणवत्तेबाबत तडजोड...संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत...
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा...जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर...
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या...
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची...नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता...