अतिवृष्टीमुळे नाशिकमध्ये ८३ हजार हेक्टरला फटका

नाशिक: सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस २७ ते ३० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची दाणादाण उडाली आहे. येवला, मालेगाव व नांदगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान आहे. त्यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे.
Due to heavy rains in Nashik 83 thousand hectares hit
Due to heavy rains in Nashik 83 thousand hectares hit

नाशिक: सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस २७ ते ३० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची दाणादाण उडाली आहे. येवला, मालेगाव व नांदगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान आहे. त्यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे.

कृषी विभागाच्या २७ ते ३० सप्टेंबर कालावधीत झालेल्या नुकसानीबाबत अंतिम प्राथमिक अहवालानुसार ८३ हजार ७५८ हेक्टरला फटका बसला आहे. जिल्ह्यात ४०० गावांमधील १ लाख शेतकरी अडचणीत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या मते हे नुकसान त्यापेक्षा अधिक आहे. पावसामुळे झालेले अंतिम नुकसान पंचनाम्यानंतरच स्पष्ट होईल. 

जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान मका पिकाचे झाले आहे. तर सोयाबीन, बाजरी, कापूस, पोळ कांदा, कांदा रोपवाटिका, भुईमूग, ज्वारी यासह भाजीपाला पिके, द्राक्ष व डाळिंबाचे नुकसान आहे. येवला, मालेगाव, नांदगाव, निफाड तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला. तर पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी व सुरगाणा तालुक्यातही नुकसान झाले. आणूनही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तुंबलेले आहे. अधूनमधून होणारा पाऊस अडचणींचा ठरत आहे.

जिल्ह्यात सप्टेंबरच्या सुरवातीला ८ व ९ तारखेला नांदगाव व मालेगाव तालुक्याला पावसाने जोरदार झोडपले होते. ओढे- नाले भरून वाहिल्याने बंधारे काठोकाठ भरल्याने तुंबून फुटले. त्यामुळे शेतीशिवारात पाणी जाऊन दाणादाण उडाली होती. हे नुकसान सोसवत नसतानाच पुन्हा पावसाने प्रकोप केला आहे. जिल्ह्यातील मुख्य नगदी पीक मका सोयाबीनचे मोठे नुकसान आहे. यासह भाजीपाला पिकांचे नुकसान आहे. 

पावसाने दणका दिल्याने जवळपास ३५ टक्के कांदा लागवडीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com