Agriculture news in marathi Due to heavy rains in Sindhudurg Damage to rice plants | Page 2 ||| Agrowon

सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात सलग चार पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या काही भागातील भात रोपे पाण्याखाली राहिल्यामुळे कुजली आहेत, तर काही शेतकऱ्यांचे भात बियाणेच वाहून गेले आहे. 

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सलग चार पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या काही भागातील भात रोपे पाण्याखाली राहिल्यामुळे कुजली आहेत, तर काही शेतकऱ्यांचे भात बियाणेच वाहून गेले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता दुबार भातरोपे तयार करावी लागणार आहेत.

जिल्ह्यात १२ जून ते १७ जून या कालावधीत मुसळधार पाऊस झाला. त्यात दोन दिवस अतिवृष्टी झाली. अनेक भागात पूरसदृश स्थिती झाली. बांदा, खारेपाटण आणि दोडामार्ग तालुक्यांतील काही गावांमध्ये पुराचे पाणी बाजारपेठेसह शेतीत शिरले. या भागातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी भात रोपे तयार केली होती. रोपांची वाढ देखील चांगली झाली होती. परंतु पुराचे पाणी सलग दोन दिवस भात रोपांवर साचून राहिले. त्यामुळे ही सर्व रोपे कुजून गेली तर काही शेतकऱ्यांची भात रोपेच वाहून गेली आहेत. रोपांकरिता घातलेले भात बियाणेच वाहून जाण्याचे प्रकार देखील सासोली परिसरात घडले 
आहेत.

 भात रोपे, भात बियाणे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आता परत भात रोपे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा जमिनीच्या मशागतीपासून सर्व कामे करावे, बियाणे खरेदी करावी लागणार आहे. या शिवाय शेतजमिनीत अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे तेथे भात रोपे तयार करताना अडचणी येणार आहेत. त्यामुळे नेमके काय करावे, या चिंतेत शेतकरी आहेत.

सध्या पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पुन्हा भात रोपे तयार करण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. अतिवृष्टीचा भात रोपांसोबत अनेक भागातील ऊस शेतीला देखील तडाखा बसला आहे. खारेपाटण परिसरातील चिंचवली गावातील ऊस शेतीत पाणी घुसून नुकसान झाले आहे.
 


इतर बातम्या
सत्तावीस कीडनाशकांच्या बंदीविषयी अहवाल...पुणे ः केंद्रीय कृषी मंत्रालयाने मागील वर्षी...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
राज्यात 'शेतमाल तारणा'तून २७ कोटी...पुणे ः कृषी पणन मंडळाद्वारे बाजार समित्यांद्वारा...
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...