तौक्ते चक्रीवादळामुळे अकोला, बुलडाण्यात नुकसान

पश्‍चिम विदर्भात झालेल्या चक्रीवादळामुळे अकोला, बुलडाणा जिल्ह्यात काही भागात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. जोरदार वादळ वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. फळबागांसह इतर मोठे नुकसान झाले.
तौक्ते चक्रीवादळामुळे अकोला, बुलडाण्यात नुकसान Due to the hurricane Akola, damage to the bulldozer
तौक्ते चक्रीवादळामुळे अकोला, बुलडाण्यात नुकसान Due to the hurricane Akola, damage to the bulldozer

अकोला : पश्‍चिम विदर्भात झालेल्या चक्रीवादळामुळे अकोला, बुलडाणा जिल्ह्यात काही भागात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. जोरदार वादळ वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. फळबागांसह इतर मोठे नुकसान झाले. रविवारी दुपारनंतर वातावरणात बदल होऊन जोराची हवा, वादळ आले. अकोला जिल्ह्यात अकोट, पातूर तालुक्यात जोरदार वादळ आले. अकोट तालुक्यात बोर्डी, रामापूर, कासोद, शिवपूर, सुकळी, उमरा या भागात वारा व पावसामुळे केळी, भुईमूग, लिंबू, संत्रा, टरबूज या पिकांना फटका बसला. ऐनवेळी आलेल्या पावसामुळे  शेतकऱ्यांची धांदल उडाली. या परिसरातील केळीची झाडे जमीनदोस्त झाले.  संत्र्याचा आंबिया बहार काही प्रमाणात गळाला. अनेकांच्या घरावरील टिनपत्र्ये उडाली. पातूर तालुक्यात चक्रीवादळामुळे फळबागांसह शेडनेट, पॉलिहाउसचे प्रचंड नुकसान झाले.  बेलगाव परिसरात सोलर पॅनेलचे नुकसान बुलडाणा जिल्ह्यात काही भागात सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे घरांवरील टिनपत्र्ये उडाली. झाडे कोलमडून पडली तसेच इतर मोठे नुकसान झाले. सिंदखेडराजा तालुक्यामध्ये जोराचा वादळी वारा व पावसाने झोडपले. फळबागा, भाजीपाला व पिकांचे नुकसान झाले. कृषीपंपासाठी लावलेल्या सौरऊर्जा पॅनेलवरील प्लेट उडून गेल्या. मेहकर तालुक्यातील बेलगाव येथे सायंकाळी हलका पाऊस झाला. मात्र, वादळी वारा जोरात वाहल्याने सोलर पंपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी विनोद गणपत बाजड यांच्या शेतातील सोलर पंप उडाला. गणपत निंबाजी बाजड यांच्याही सोलर पंपाचे नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com