परभणीत इंधन दरवाढीमुळे शेतकऱ्यांना शेतीखर्च परवडेना

परभणी : डिझेल, पेट्रोल या इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे ट्रॅक्टरसह अन्य यंत्रांव्दारे केल्या जाणाऱ्या शेतीकांमाच्या, वाहतुकीच्या खर्चात वाढ झाली आहे.
  Due to increase in fuel prices in Parbhani, farmers could not afford farming expenses
Due to increase in fuel prices in Parbhani, farmers could not afford farming expenses

परभणी : डिझेल, पेट्रोल या इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे ट्रॅक्टरसह अन्य यंत्रांव्दारे केल्या जाणाऱ्या शेतीकांमाच्या, वाहतुकीच्या खर्चात वाढ झाली आहे. खते, किटकनाशके आदी निविष्ठा, मजुरीचे वाढलेलेले दर, त्यात इंधन दर वाढीची भर पडली. त्यामुळे शेतमालाचा उत्पादन खर्च वाढणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार आहे. शेतमालाच्या दरात वाढ करुन इंधन दर वाढ कमी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

मजुरांच्या समस्यामुळे तसेच बैलजोड्या सांभाळणे शक्य होत नसल्यामुळे अनेक शेतकरी कृषी यांत्रिकिकरणाकडे वळले आहेत. अनेक बेरोजगार, अल्पभूधारक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी करुन शेतीकामाचे व्यवसाय सुरु केले आहेत. विविध पिकांच्या फवारणीसाठी पेट्रोलवर चालणाऱ्या पंपाचा वापर केला जातो.

विजपुरवठ्याची सुविधा नसलेल्या ठिकाणी मळणीयंत्रासाठी डिझेल इंजिनचा वापर करावा लागतो. शेतीकामासह, वाहतुकीसाठी डिझेलचा अधिक वापर होतो. गेल्या काही दिवसांत डिझेल दर पेट्रालच्या बरोबरीत आले आहेत. त्यामुळे डिझेलवर चालणाऱ्या यंत्राव्दारे केल्या जाणाऱ्या शेतीकामाच्या दरात वाढ होईल.

यंदा खरीप पूर्व मशगातीची कामे तसेच पेरणीच्या वेळी इंधनाचे दर कमी आहेत. आता इंधन दरात १० ते १२ रुपयांची वाढ झाली आहे. सध्या डिझेल प्रतिलिटर ८० रुपये, तर पेट्रोलचे दर ८९ रुपयापर्यंत वाढले आहेत. इंधन दरात दररोज बदल होत आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. येत्या काळात खरीप पिकांची हार्वेस्टरव्दारे काढणी, मळणीच्या दरात मोठी वाढ होईल. रब्बी हंगाम पूर्व मशागती, तसेच पेरणीच्या कामाच्या दरात देखील वाढ होईल. पेट्रोल वर चालणाऱ्या फवारणी पंपाचा खर्च देखील वाढणार आहे. इंधन दर वाढीमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ होऊन नुकसानच होणार आहे.

इंधन दर वाढीपेक्षा खते, किटकनाशकांच्या किमंतीत मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत शेतमालाला दर मिळत नाहीत. इंधन दर वाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ होईल. त्यामुळे शेतमालाच्या किंमतीत देखील वाढ करावी. - एकनाथराव साळवे, सिंगणापूर, जि. परभणी.

ट्रॅक्टरव्दारे मशागती, पेरणीची कामे जुन्याच दराने झाली. पेट्रोलवर चालणाऱ्या फवारणी पंपाचा देखभाल दुरुस्ती खर्च जास्त आहे. त्यामुळे बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपांचा वापर वाढला आहे. त्यामुळे पेट्रोलदर वाढीमुळे खर्चात फारशी वाढ होणार नाही. परंतु, येत्या काळात डिझेलवरील यंत्राचा खर्च वाढेल

.- ज्ञानेश्वर माटे, अर्धापूर, जि. नांदेड

मजुरांच्या समस्यांमुळे शेतीमध्ये विविध यंत्राचा वापर वाढला आहे. इंधनदरात वाढ झाल्यामुळे यंत्राच्या भाडे दरात वाढ होईल. त्यामुळे इंधन दर वाढ रद्द करण्याची गरज आहे. - संजय पिसुरे, माटेगाव, जि. हिंगोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com