Agriculture news in marathi Due to increase in stocks in Khandesh, cotton, It's time to dump her and move on | Page 2 ||| Agrowon

खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी खरेदी बंद करण्याची वेळ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 मे 2020

जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे पासून सुरू आहे. या खरेदीची गती सध्या संथ झाली आहे. अनेक खरेदी केंद्रांमध्ये कापूस व सरकीचा साठा वाढल्याने खरेदी बंद करण्याची वेळ आली आहे. 

जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे पासून सुरू आहे. या खरेदीची गती सध्या संथ झाली आहे. अनेक खरेदी केंद्रांमध्ये कापूस व सरकीचा साठा वाढल्याने खरेदी बंद करण्याची वेळ आली आहे. 

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्‍यातही खरेदी संथ असल्याची तक्रार शेतकरी व कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली आहे. कापूस महामंडळाचे (सीसीआय) खानदेशात धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार, जळगावमधील बोदवड, जामनेर, पहूर (ता.जामनेर), शेंदूर्णी (ता.जामनेर), भुसावळ, चोपडा, जळगाव, पाचोरा येथे खरेदी केंद्र सुरू होते. यातील जळगाव व इतर दोन केंद्रे कापसाचा साठा वाढल्याने आणि मजूरटंचाईमुळे बंद करण्यात आली आहेत. 

‘सीसीआय’च्या केंद्रात लॉकडाउनच्या काळात सुमारे दीड लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. तर, पणन महासंघानेदेखील आपल्या धुळे, मालेगाव (जि.नाशिक), धरणगाव, पारोळा, अमळनेर, एरंडोल येथील केंद्रांमध्ये लॉकडाऊनच्या काळात मिळून एक लाख ५१ हजार क्विंटलपेक्षा अधिक खरेदी केली आहे. परंतु, ‘सीसीआय’ची खरेदी बोदवड, जळगाव, जामनेर, पाचोरा भागात संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे. त्याची विक्री केव्हा होईल? याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. 

चुकारे अप्राप्तच 

लॉकडाऊनच्या काळात पणन महासंघ व ‘सीसीआय’च्या केंद्रांत जेवढ्या कापसाची खरेदी झाली, त्यापोटी एकाही शेतकऱ्याला चुकारे (पैसे) प्राप्त झालेले नाहीत. पणन महासंघ व ‘सीसीआय’च्या औरंगाबाद येथील कार्यालयात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्मचारी कमी संख्येने येतात. तसेच औरंगाबादमधील संबंधित बॅंकांमध्येही कोरोनामुळे अडचणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

 
 


इतर अॅग्रो विशेष
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...