agriculture news in marathi, due to lack of rain farmers starts to use drip irrigation, akola, maharashtra | Agrowon

अकोला जिल्ह्यात पावसाने खंड देताच पिकांना तुषार सिंचन
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जुलै 2019

अकोला : पावसाने खंड देताच शेतकरी पिके वाचवण्यासाठी धडपड करू लागले आहेत. पिकांना ही ओढ सहन होणार नसल्याने काही शेतकऱ्यांनी तुषार पद्धतीने सिंचन सुरू केले आहे.

अकोला : पावसाने खंड देताच शेतकरी पिके वाचवण्यासाठी धडपड करू लागले आहेत. पिकांना ही ओढ सहन होणार नसल्याने काही शेतकऱ्यांनी तुषार पद्धतीने सिंचन सुरू केले आहे.

जिल्ह्यात आजवर असमतोल स्वरूपात पाऊस झालेला आहे. त्यामुळे पेरण्यासुद्धा मागे-पुढे झाल्या आहेत. सुरवातीच्या टप्प्यात पेरणी केलेल्यांची पिके साधली आहेत. मात्र आता अनेक भागांत जवळपास १५ दिवसांपासून पाऊस झालेला नाही. ताशी लागलेल्या पिकांमध्ये सध्या आंतरमशागत, तणनाशकाची फवारणी, निंदण आदी कामे जोमाने सुरू आहेत. मात्र पावसाचा ताण पिकांवर पडणे सुरू झाले आहे. दुपारच्या सुमारास पिके कोमजलेली दिसून येतात. याचा फटका बसू नये यासाठी शेतकऱ्यांनी सिंचन सुरू केले आहे.

जिल्ह्यात आजवर सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. मूर्तिजापूर तालुक्यात तर पेरण्यासुद्धा झालेल्या नाहीत. जिल्ह्यात अद्यापही ४० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होणे बाकी आहे. आता पावसात खंड पडला असून या भागात आणखी चार ते पाच दिवस पाऊस उघडीप घेऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. असे झाल्यास पावसाचा हा खंड १५ दिवसांवर पोचू शकतो. अशावेळी उगवलेली पिके; तसेच पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके अडचणीत सापडू शकतात. यासाठी शेतकऱ्यांची आता लगबग वाढली आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी सिंचनाचे काम हाती घेतले आहे.

इतर ताज्या घडामोडी
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...