शिवगंगा खोऱ्यात पावसाअभावी भातखाचरे कोरडी

भात खाचरे कोरडी
भात खाचरे कोरडी

खेड-शिवापूर, जि. पुणे  : शिवगंगा खोऱ्यात पुरेशा पावसाअभावी भात खाचरे कोरडी पडली आहेत. यावर्षी ऑगस्ट महिना उजाडला तरी अजूनही अनेक गावात भात लागवड झालेली नाही. अजून आठवडाभर पाऊस न झाल्यास यावर्षी भातपीक घेता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

जून महिन्यात पेरणी झाल्यानंतर मोठा पाऊस झाला नाही. अधून-मधून झालेल्या रिमझिम पावसावर उगवून आलेली इतर पिके तराराली आहेत. मात्र, मोठा पाऊस नसल्याने ओढे - नाले आणि भात खाचरात पाणी नाही. त्यामुळे यावर्षी ऑगस्ट महिना उजाडला तरी शिवगंगा खोऱ्यातील अनेक गावांत भात लागवड झालेली नाही. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरीचे पाणी आहे, अशा शेतकऱ्यांनी खाचरात पाणी सोडून भात लागवड केली आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात भातखाचरे कोरडी पडली आहेत. तसेच भात रोपे पिवळी पडली असून, रोपे जास्त कालावधीची झाल्याने लावता येणार नाहीत, अशी स्थिती आहे.

नागपंचमीपर्यंत मोठा पाऊस होऊन भातखाचरात पाणी झाले तरच भात लागवड करता येईल; अन्यथा यावर्षी भात पीक घेता येणार नाही, असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com