पुणे जिल्ह्यात पावसाअभावी भात लागवडी खोळंबल्या 

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील तालुक्यांत पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे भात लागवडी खोळंबल्या असून वेळेवर भाताच्या पुर्नलागवडी न झाल्यास खरीप हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Due to lack of rains, paddy cultivation was delayed
Due to lack of rains, paddy cultivation was delayed

पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील तालुक्यांत पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे भात लागवडी खोळंबल्या असून वेळेवर भाताच्या पुर्नलागवडी न झाल्यास खरीप हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पुर्नलागवडी झाल्या असल्या तरी मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव या भागात पुर्नलागवडी झालेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असून वेळेवर पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडी सुरू केल्या आहेत. मात्र, पाच ते सहा दिवसांपासून काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत दहा हजार ५८३ हेक्टर म्हणजेच १८ टक्के क्षेत्रावर भाताच्या पुर्नलागवडी झाल्या आहेत. जिल्ह्यात भाताचे सरासरी ७२ हजार ९५४ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ६२ हजार ५०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी वीस ते पंचवीस दिवस अगोदर रोपवाटिका शेतकरी तयार करतात. सध्या अनेक ठिकाणी भात रोवाटिकेतील रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. मात्र, सुरुवातीला रोपे टाकलेल्या रोपवाटिकेतील रोपे लागवडीला आली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लागवडी केल्या आहेत. त्यासाठी आवश्यक असलेला पाऊस पडत होता. त्यामुळे भात पट्यातील वेळेत भात लागवडी करण्यावर भर देत पुर्नलागवडी करण्यावर भर देत होते. 

यंदा लवकर पाऊस दाखल झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रोपवाटिका टाकल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिकेच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. आत्तापर्यंत जवळपास चार हजार ३८२ हेक्टरवर रोपवाटिका तयार झाल्या आहेत. चालू वर्षी अनेक शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका टाकण्याऐवजी मावळ व मुळशी भागातील काही शेतकऱ्यांनी एसआरटी पद्धतीने थेट भात लागवडी केल्या आहेत. त्यामुळे रोपवाटिकेच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता होती. मात्र, वेळेवर झालेल्या पावसामउळे भात पट्यात आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिका तयार झाल्या असून भात रोपे वाढीच्या अवस्थेत आहे. 

भोर, वेल्हा, मुळशीत अल्प लागवडी  चालू आठवड्यात चांगला पाऊस झाल्यास पुढील आठवड्यापासून भात रोपांच्या लागवडीला आणखी वेग येईल. आत्तापर्यंत हवेली, मुळशी, भोर, मावळ, वेल्हे, जुन्नर, खेड, आंबेगाव, पुरंदर तालुक्यात अत्यल्प प्रमाणात पुर्नलावडी झाल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com