रस्त्यांअभावी शेतीची वाट झाली बिकट

Due to the lack of roads, the agriculture has become difficult
Due to the lack of roads, the agriculture has become difficult

वर्धा ः पालकमंत्री पांदण रस्ते योजनेचा गवगवा केला जात असतानाच नागपूर वर्धा रस्त्यालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांना मात्र पांढरे सोने घरी आणताना चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणात शेतीचा भाग सखल तर रस्ता उंच झाल्याने शेतकऱ्यांवर हे संकट ओढवले आहे. 

नागपूर - वर्धा महामार्गाचे नुकतेच चौपदरीकरण करण्यात आले. परंतु, हे काम करताना या भागातील शेती आणि शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. या मार्गावर शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतालगत नाला वाहतो. रस्ते रुंदीकरणादरम्यान रस्त्याकडील भाग उंच तर शेतीकडील भाग सखल झाला आहे. त्यामुळे शेतातून शेतमाल घरी नेण्यासाठी हा नाला पार करताना शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागते. 

अनेकदा शेतमाल भरलेली बैलगाडी नेताना चाक नाल्यात फसल्याच्या घटना घडल्या. त्यासोबतच बैलगाडी उलटण्याचेही प्रकार घडल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या भागातील पंचवीसपेक्षा अधिक शेतकऱ्यांना हा नाला पार करावा लागतो. हंगामात शेतापर्यंत निविष्ठा नेणे आणि शेतमाल घरी आणण्यासाठी देखील याच रस्त्याचा पर्याय आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांचा हा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रशासनीक पातळीवर प्रयत्न होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. 

खासगी वाहनातून पोचविला कापूस नागपूर वर्धा मार्गावर शेती असलेल्या पंढरी ढगे यांनी बैलगाडीत कापूस आणला. परंतु, बैलगाडीचे चाक फसल्याने कापूस घरी नेण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. अखेरीस त्यांनी खासगी मालवाहू वाहन भाडेतत्त्वावर ठरवीत बैलगाडीतील कापसाचे गाठोडे त्यात टाकले. त्यानंतर शेतमाल कसाबसा घरी पोचविण्यात ते यशस्वी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com