जायकवाडीच्या पाण्याअभावी पिके होरपळली 

परभणी ः जायकवाडीच्या डावा कालव्याच्या सिंचन प्रणालीअंतर्गत शाखा कालवा क्रमांक ६८ च्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेवर पाणी आवर्तन न सोडल्यामुळे तसेच विसर्ग कमी असल्यामुळे उन्हाळी भुईमूग, ऊस आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी कालव्याच्या प्रवाहाचा विसर्ग १ हजार ३०० क्यूसेक पर्यंत वाढवावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
Due to lack of water in Jayakwadi, the crops were destroyed

जायकवाडी डाव्या कालव्याअंतर्गत शाखा कालवा क्रमांक ६८, ६७, ६४ च्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी १२ मार्च रोजी पाणी आर्वतन सोडण्यात आले होते. ते २७ मार्चला बंद करण्यात आले. तेंव्हापासून म्हणजे ३८ दिवसांपासून या कालव्यांना पाणी नसल्यामुळे उन्हाळी भुईमूग, ऊस, चारा पिकांचे होरपळून नुकसान झाले आहे. 

कालवा क्रमांक ६८ अंतर्गत परभणी आणि पूर्णा तालुक्यातील पाथरा, पाढंरी, पोरजवळ, कबलापूर, मजलापूर, ताडलिमला, दस्तापूर, फुलकळस, माखणी, मिरखेल, सिरकळस, ताडकळस, बलसा, वरपूड, बानेगाव, लिमला, खंडाळा, देऊळगाव, आरखेड, कळगाववाडी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या गावांतील शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी कालव्याच्या पाण्याचा विसर्ग १ हजार ३०० क्यूसेक पर्यंत वाढवावा, अशी मागणी सोनटक्के यांनी जलसंपदा मंत्री पाटील यांच्याकडे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com