Agriculture news in Marathi, Due to the open rain, rice cultivation can be avoided | Agrowon

पावसाने उघडीप दिल्याने भात लागवडी खोळंबल्या 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांत गेल्या चार ते पाच दिवसांपासून उघडीप दिली आहे. यामुळे भात लागवडी खोळंबल्या असून वेळेवर भाताच्या पुनर्लागवडी न झाल्यास खरीप हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पुनर्लागवडी झाल्या असल्या तरी अनेक भागात पुनर्लागवडी न झाल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. 

पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांत गेल्या चार ते पाच दिवसांपासून उघडीप दिली आहे. यामुळे भात लागवडी खोळंबल्या असून वेळेवर भाताच्या पुनर्लागवडी न झाल्यास खरीप हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पुनर्लागवडी झाल्या असल्या तरी अनेक भागात पुनर्लागवडी न झाल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. 

पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडी सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सात हजार २९२ हेक्टर म्हणजेच १० टक्के क्षेत्रावर भाताच्या पुनर्लागवडी झाल्या आहेत. जिल्ह्यात भाताचे सरासरी ७२ हजार ९५४ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ६२ हजार ५०० हेक्टरवर लागवडी होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी वीस ते पंचवीस दिवस अगोदर रोपवाटिका शेतकरी तयार करतात. 

सध्या अनेक ठिकाणी भात रोवाटिकेतील रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. मात्र, सुरवातीला टाकलेल्या रोपवाटिकेतील रोपे लागवडीला आली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लागवडी केल्या आहेत. त्यासाठी आवश्यक असलेला पाऊस पडत होता. त्यामुळे भात पट्ट्यातील वेळेत भात लागवडी करण्यावर भर देत पुनर्लागवडी करण्यावर भर देत होते. गेल्या वर्षीही याच काळात पुणे जिल्ह्यात चार हजार हेक्टरवर भात रोपवाटिका तयार झाल्या होत्या. यंदा पावसाने उशीर केला असला तरी काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर रोपवाटिका टाकल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिकेच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. अजूनही काही ठिकाणी शेतकरी भात रोपवाटिका टाकत आहे.

तालुकानिहाय भाताच्या पुनर्लागवडी पुढीलप्रमाणे ः
चालू आठवड्यात चांगला पाऊस झाल्यास पुढील आठवड्यापासून भातरोपांच्या लागवडीला आणखी वेग येईल. आतापर्यंत हवेलीत ९५० हेक्टर, मुळशी ९४०, भोर १८७५, मावळ ९३०, वेल्हे ७७५, जुन्नर १८०, खेड ७७२, आंबेगाव ६५०, पुरंदर २२० हेक्टरवर भाताच्या पुनर्लागवडी झाल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 
 


इतर बातम्या
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात कृषी...औरंगाबाद : मागण्यांबाबत कार्यवाही होत नसल्याने...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
परभणी, नांदेड, हिंगोलीत निविष्ठा...परभणी : कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी विविध...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...