संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला 

गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी मंगळवारी (ता. १३) घटल्याने फुलांचे दर १० ते २० टक्क्यांनी कमी झाले. संभाव्य टाळेबंदीमुळेही फुलाचे दर पडले असून, फूलच बाजार कोमेजला आहे.
 संभाव्य टाळेबंदीमुळे  फूल बाजार कोमेजला Due to potential layoffs Flower Bazaar Comejla
संभाव्य टाळेबंदीमुळे  फूल बाजार कोमेजला Due to potential layoffs Flower Bazaar Comejla

पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी मंगळवारी (ता. १३) घटल्याने फुलांचे दर १० ते २० टक्क्यांनी कमी झाले. संभाव्य टाळेबंदीमुळेही फुलाचे दर पडले असून, फूलच बाजार कोमेजला आहे. फूल बाजाराचा समावेश अत्यावश्‍यक सेवेत करून, खरेदी-विक्री सुरू ठेवावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांकडून होत आहे. 

गेल्या वर्षीच्या टाळेबंदीमध्ये सर्वाधिक फटका फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. धार्मिक स्थळे, लग्न समारंभ बंद असल्याने आणि फुलांचा समावेश अत्यावश्‍यक सेवेत नसल्याने फुलांचा बाजार बंद होता.

या वर्षी देखील संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार बंद राहणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे. नुकत्याच झालेल्या शनिवार, रविवारच्या सुट्यांच्या टाळेबंदीत फुलबाजार बंद होता. मात्र सोमवारी बाजार सुरू झाल्यानंतर गुढीपाडव्या निमित्त फुलांची मागणी वाढल्याने आवक आणि दर वाढले होते. मात्र मंगळवारी सर्वच फुलांची मागणी घटल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली होती, अशी माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली. 

गेल्या टाळेबंदीत फुलांचा बाजार शंभर टक्के बंद असल्याने फुले काढणीचा आणि टाकून देण्याचा खर्च देखील शेतकऱ्यांना करावा लागला. या वर्षीच्या संभाव्य टाळेबंदीत किमान ५० टक्क्यांनी फूल बाजार सुरू ठेवावा. शेती उत्पादन असल्याने फुलांचा अत्यावश्‍यक वस्तूंमध्ये समावेश करावा, अशी मागणी तळेगाव फ्लोरिक्चर पार्क फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष व्ही. एम. जम्मा यांनी केली आहे.  मंगळवारचे प्रति किलोचे दर  झेंडू ५-१०, गुलछडी ६०-१२०, बिजली ४०-१००, कापरी -२०-४०, ॲस्टर (चार फुलांची जुडी ) १५-२०, सुट्टा किलो - ५०-७०, गुलाबगड्डी (१२ फुलांची जुडी) १०-२०, डच गुलाब (२० नग) - २५-४०. जर्बेरा १०-२०, कार्नेशन ६०-८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com