Agriculture news in marathi Due to potential layoffs Flower Bazaar Comejla | Agrowon

संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 एप्रिल 2021

गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी मंगळवारी (ता. १३) घटल्याने फुलांचे दर १० ते २० टक्क्यांनी कमी झाले. संभाव्य टाळेबंदीमुळेही फुलाचे दर पडले असून, फूलच बाजार कोमेजला आहे. 

पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी मंगळवारी (ता. १३) घटल्याने फुलांचे दर १० ते २० टक्क्यांनी कमी झाले. संभाव्य टाळेबंदीमुळेही फुलाचे दर पडले असून, फूलच बाजार कोमेजला आहे. फूल बाजाराचा समावेश अत्यावश्‍यक सेवेत करून, खरेदी-विक्री सुरू ठेवावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांकडून होत आहे. 

गेल्या वर्षीच्या टाळेबंदीमध्ये सर्वाधिक फटका फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. धार्मिक स्थळे, लग्न समारंभ बंद असल्याने आणि फुलांचा समावेश अत्यावश्‍यक सेवेत नसल्याने फुलांचा बाजार बंद होता.

या वर्षी देखील संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार बंद राहणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे. नुकत्याच झालेल्या शनिवार, रविवारच्या सुट्यांच्या टाळेबंदीत फुलबाजार बंद होता. मात्र सोमवारी बाजार सुरू झाल्यानंतर गुढीपाडव्या निमित्त फुलांची मागणी वाढल्याने आवक आणि दर वाढले होते. मात्र मंगळवारी सर्वच फुलांची मागणी घटल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली होती, अशी माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली. 

गेल्या टाळेबंदीत फुलांचा बाजार शंभर टक्के बंद असल्याने फुले काढणीचा आणि टाकून देण्याचा खर्च देखील शेतकऱ्यांना करावा लागला. या वर्षीच्या संभाव्य टाळेबंदीत किमान ५० टक्क्यांनी फूल बाजार सुरू ठेवावा. शेती उत्पादन असल्याने फुलांचा अत्यावश्‍यक वस्तूंमध्ये समावेश करावा, अशी मागणी तळेगाव फ्लोरिक्चर पार्क फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष व्ही. एम. जम्मा यांनी केली आहे. 

मंगळवारचे प्रति किलोचे दर 
झेंडू ५-१०, गुलछडी ६०-१२०, बिजली ४०-१००, कापरी -२०-४०, ॲस्टर (चार फुलांची जुडी ) १५-२०, सुट्टा किलो - ५०-७०, गुलाबगड्डी (१२ फुलांची जुडी) १०-२०, डच गुलाब (२० नग) - २५-४०. जर्बेरा १०-२०, कार्नेशन ६०-८०


इतर बाजारभाव बातम्या
नगरमध्ये दोडका, वांगी, भेंडीच्या दरात...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नागपुरात सोयाबीन दरात तेजीनागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम असून कळमना...
चाकणच्या जनावरांच्या बाजारात ७० लाखांची...चाकण, जि. पुणे : येथील महात्मा फुले बाजार आवारात...
राज्यात जांभळांना ३००० ते १६००० रुपयेजळगावात क्विंटलला ६००० ते ९००० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याची आवक घटली; दरात...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहात...
औरंगाबादमध्ये आंब्यांना सरासरी २४५० ते...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये आंब्यांचे...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात लसूण ३५०० ते १२००० रुपयेपरभणीत क्विंटलला ५००० ते ६५०० रुपये परभणी...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार...
पुण्यात कांदा, बटाटा, घेवड्याच्या दरात...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात लिंबू ६०० ते ३००० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते २००० रुपये...
नागपुरात सोयाबीनला ७४०० रुपयांचा दरनागपूर : कळमना बाजार समितीत सोयाबीनमधील तेजी कायम...
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात १० ते २०...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात हिरवी मिरची १००० ते ३००० रुपयेजळगावात क्विंटलला १८०० ते २८०० रुपये...
सोलापुरात डाळिंबाच्या दरात तेजी टिकूनसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा, मागणी...पुणे ः पुणे बाजार समितीमध्ये सोमवारी (ता.१७)...
राज्यात कांदा १०० ते १५०० रुपयेसोलापुरात क्विंटलला १०० ते १००० रुपये सोलापूर...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात गाजर, काकडी, लिंबाला उठाव;...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
राज्यात गवार १००० ते ४००० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये...