निफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात द्राक्षबागा जमीनदोस्त

नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष हंगाम अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. मोठे कष्ट व लाखो रुपयांचा उत्पादन खर्च करून चालू द्राक्ष हंगामात उत्पादन घेतले आहे. मात्र, गुरुवारी (ता. २६) झालेल्या अवकाळीच्या तडाख्यात निफाड तालुक्यातील अनेक गावांमधील द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पाठोपाठ आता नैसर्गिक आपत्तीला द्राक्ष उत्पादकांना सामोरे जावे लागत आहे.
Due to the rain, the grape garden collapsed in Niphad

तालुक्यात पूर्वमोसमी पावसाला सलग दुसऱ्या दिवशी सुरुवात झाली. पावसाच्या पाठोपाठ झालेल्या वादळ वाऱ्यामुळे तसेच गारपिटीच्या तडाख्यात काढणीसाठी तयार बागा बागांना फटका बसला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर माल बाधित झाला. तसेच शिंगवे, करंजगाव, भेंडाळी, श्रीरामनगर, धारणगाव खडक, देवगाव येथील शेतकऱ्यांच्या बागा आडव्या पडल्या आहेत. 

अगोदरच कोरोनामुळे व्यापारी माल खरेदी करत नसल्याने शेतकरी विवंचनेत होते. त्यामुळे बेदाणा करण्यासाठी अनेकांनी पसंती दिली होती. मात्र, काढणीपूर्वीच माल मातीमोल झाला आहे. त्यामुळे एकरी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला असून आता पुन्हा बागा उभ्या करण्यासाठी मोठा खर्च येणार असल्याने शेतकऱ्यांची ऐन हंगामात कोंडी झाल्याने अडचणीत वाढ झाली आहे. 

तालुक्यातील शिंगवे येथील शेतकरी जगन्नाथ डेर्ले यांची एक एकर क्षेत्रावर बाग होती. माल चांगला असल्याने बागेत लोड असल्याने वादळी वाऱ्यामुळे बाग जमीनदोस्त झाली. यात त्यांच्या १५० क्विंटल मालाचे नुकसान झाले. करंजगाव येथील पांडुरंग पगार यांचा सोनाका वाणाची दीड एकर बाग काढणीसाठी असताना ३०० क्विंटल माल भुईसपाट झाला आहे. या बागेसाठी ६ ते ७ लाख रुपये खर्च केला होता. भेंडाळी येथे भाऊसाहेब वाळू कमानकर यांची दीड एकर थॉमसन वाणाची बाग होती. वादळामुळे उभे केलेले लोखंडी खांब वाकून बागांच्या तारा तुटल्याने बाग भूईसपाट झाली.

सध्या या बागांची काढणी सुरू असताना ४०० क्विंटल नुकसान झाले. श्रीरामनगर येथे संजय रावसाहेब काळे यांची दीड एकर थॉमसन वाणाची बाग होती. त्यावर २०० क्विंटल लोड होता. धारणगाव येथेही राहुल जाधव यांची दोन एकर तर देवगाव येथील विलास बोचरे यांची बाग वाऱ्यामुळे पडली आहे.  वाईट परिस्थिती आहे. अगोदरच कोरोनामुळे मागणी नव्हती. त्यात नुकसान झाल्याने आता हातच सर्वच गेलं आहे. त्यामुळे सरकारने आधार द्यावा. - जगन्नाथ डेर्ले, द्राक्ष उत्पादक, शिंगवे, ता. निफाड  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com