पुणे जिल्ह्यात पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा

पुणे जिल्ह्यात पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा
पुणे जिल्ह्यात पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा

पुणे ः गेल्या दोन दिवसांपूर्वी अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. यामुळे खरिपातील पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ३० हजार ८३० हेक्टरपैकी ८६ हजार ५०८ हेक्टर म्हणजेच ३७ टक्के पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. 

यंदा जोरदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना लागून होती. मात्र, मॉन्सून उशिराने दाखल झाल्याने पुणे विभागात अनेक ठिकाणी कमी अधिक पाऊस पडला. पुणे जिल्ह्यामध्ये १६८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर १ ते २२ जुलै या कालावधीत पुण्यामध्ये २७६.९ पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा काही भागांत हलक्या सरी बरसल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्‌ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांतही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

गेल्या महिन्यापासून खरिपाच्या पेरण्यांना शेतकऱ्यांनी सुरवात केली होती. पंधरा दिवसांपासून पुरेसा पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना होती. पुणे जिल्ह्यामध्ये पूर्वेकडील शिरूर, दौड, इंदापूर, बारामती, पुरंदर, खेड या तालुक्यांत अजूनही जोरदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. तरीही काही ठिकाणी अधूनमधून झालेल्या पावसामुळे तुरळक ठिकाणी बाजरी, तूर, मगू, मका, भूईमूग व सोयाबीन पिकांच्या अल्प पेरण्या झाल्या होत्या. भात पट्‌ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांत भात व नाचणीच्या रोपवाटिकेत रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. या भागात चांगला पाऊस पडल्यामुळे २८ हजार २३७ हेक्टरवर भाताच्या पुनर्लागवडी झाल्या आहेत. 

पीकनिहाय झालेली पेरणी, हेक्टरमध्ये  भात २८,२३७, ज्वारी ३८२, बाजरी १६,६६६, रागी ३२८, मका ४७०८, खरीप तृणधान्ये ३३०, तूर ४०२, मूग १०,२७३, उडीद ३५४, इतर खरीप कडधान्ये १५७३, भूईमूग ७९४२, तीळ १८७, कारळे २७२, सूर्यफूल १७, सोयाबीन १४,८१७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com