आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
बातम्या
काही ठिकाणी सोयाबीन, कपाशीच्या नासाडीची भीती
नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. पाण्याचा ताण बसलेल्या हिरव्या पिकांना पावसाचा फायदा होणार आहे. रब्बी हंगामातील पेरणीसाठीही पाऊस उपयुक्त ठरणार आहे. परंतु काढणीस आलेल्या सोयाबीनचे तसेच उन्हामुळे तडकून फुटलेल्या बोंडातील कापसाचे मोठे नुकसान होणार आहे.
नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. पाण्याचा ताण बसलेल्या हिरव्या पिकांना पावसाचा फायदा होणार आहे. रब्बी हंगामातील पेरणीसाठीही पाऊस उपयुक्त ठरणार आहे. परंतु काढणीस आलेल्या सोयाबीनचे तसेच उन्हामुळे तडकून फुटलेल्या बोंडातील कापसाचे मोठे नुकसान होणार आहे.
नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांत महिनाभराच्या खंडानंतर अद्याप पाऊस नाही. त्यामुळे परिपक्वेतेच्या अवस्थेतील उभी पिके जागीच होरपळून गेली आहे. काही भागांत सुरवातीला पेरणी केलेले सोयाबीन काढणीच्या अवस्थेत आहे. काही भागात काढणी सुरू झाली आहे. उन्हामुळे कपाशीच्या बोंडातून कापूस फुटला आहे. दीर्घ खंडानंतर गेल्या तीन ते चार दिवसांपासून अनेक भागात पाऊस सुरू झाला आहे. या पावसाचा भारी जमिनीवरील हिरव्या पिकांना फायदा होणार आहे.
रब्बी पेरणीसाठी पाऊस फायदेशीर ठरणार आहे. परंतु काढणीच्या अवस्थेतील सोयाबीन आणि फुटलेल्या कापसाचे मात्र नुकसान होणार आहे. मुगाप्रमाणेच ऐन काढणीच्या वेळी पाऊस सुरू झाल्यास सोयाबीन डागील तर कापूस पिवळा पडून ज्वारीचे दाणे ही काळे पडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बाजारभाव कमी मिळून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील ४९ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.
नांदेड जिल्ह्यतील नांदेड, अर्धापूर, मुदखेड, भोकर, कंधार, लोहा, किनवट, माहूर, हदगाव या नऊ तालुक्यांतील २९ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्यांतील १४ मंडळामध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील ६ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.
मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)
नांदेड जिल्हा ः नांदेड १२, नांदेड ग्रामीण १५, वजीराबाद ८, तुप्पा २०, वसरणी १३, तरोडा २०, कंधार ७, फुलवळ ४०, माळकोळी २१, कलंबर १०, किनवट ४, बारड ७, माहूर ८, वानोळा ४, वाई ६, सिंदखेड १४, दाभड ४४, मालेगाव ५७.
परभणी जिल्हा ः परभणी ७, परभणी ग्रामीण १७, सिंगणापूर ३५, दैठणा ६, पिंगळी १९, राणीसावरगाव १५, कात्नेश्वर ३७, बनवस ६०, सोनपेठ ६, केकरजवळा २८.
हिंगोली जिल्हा ः कळमनुरी १४, वसमत १५, हयातनगर ६१, गिरगाव ४, हट्टा ७, टेंभुर्णी ७.
- 1 of 1543
- ››