agriculture news in marathi, due to rain, soyabean and cotton in lose | Page 2 ||| Agrowon

काही ठिकाणी सोयाबीन, कपाशीच्या नासाडीची भीती
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. पाण्याचा ताण बसलेल्या हिरव्या पिकांना पावसाचा फायदा होणार आहे. रब्बी हंगामातील पेरणीसाठीही पाऊस उपयुक्त ठरणार आहे. परंतु काढणीस आलेल्या सोयाबीनचे तसेच उन्हामुळे तडकून फुटलेल्या बोंडातील कापसाचे मोठे नुकसान होणार आहे.

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. पाण्याचा ताण बसलेल्या हिरव्या पिकांना पावसाचा फायदा होणार आहे. रब्बी हंगामातील पेरणीसाठीही पाऊस उपयुक्त ठरणार आहे. परंतु काढणीस आलेल्या सोयाबीनचे तसेच उन्हामुळे तडकून फुटलेल्या बोंडातील कापसाचे मोठे नुकसान होणार आहे.

नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांत महिनाभराच्या खंडानंतर अद्याप पाऊस नाही. त्यामुळे परिपक्वेतेच्या अवस्थेतील उभी पिके जागीच होरपळून गेली आहे. काही भागांत सुरवातीला पेरणी केलेले सोयाबीन काढणीच्या अवस्थेत आहे. काही भागात काढणी सुरू झाली आहे. उन्हामुळे कपाशीच्या बोंडातून कापूस फुटला आहे. दीर्घ खंडानंतर गेल्या तीन ते चार दिवसांपासून अनेक भागात पाऊस सुरू झाला आहे. या पावसाचा भारी जमिनीवरील हिरव्या पिकांना फायदा होणार आहे.

रब्बी पेरणीसाठी पाऊस फायदेशीर ठरणार आहे. परंतु काढणीच्या अवस्थेतील सोयाबीन आणि फुटलेल्या कापसाचे मात्र नुकसान होणार आहे. मुगाप्रमाणेच ऐन काढणीच्या वेळी पाऊस सुरू झाल्यास सोयाबीन डागील तर कापूस पिवळा पडून ज्वारीचे दाणे ही काळे पडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बाजारभाव कमी मिळून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील ४९ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यतील नांदेड, अर्धापूर, मुदखेड, भोकर, कंधार, लोहा, किनवट, माहूर, हदगाव या नऊ तालुक्यांतील २९ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्यांतील १४ मंडळामध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील ६ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)
नांदेड जिल्हा
ः नांदेड १२, नांदेड ग्रामीण १५, वजीराबाद ८, तुप्पा २०, वसरणी १३, तरोडा २०, कंधार ७, फुलवळ ४०, माळकोळी २१, कलंबर १०, किनवट ४, बारड ७, माहूर ८, वानोळा ४, वाई ६, सिंदखेड १४, दाभड ४४, मालेगाव ५७.
परभणी जिल्हा ः परभणी ७, परभणी ग्रामीण १७, सिंगणापूर ३५, दैठणा ६, पिंगळी १९, राणीसावरगाव १५, कात्नेश्वर ३७, बनवस ६०, सोनपेठ ६, केकरजवळा २८.
हिंगोली जिल्हा ः कळमनुरी १४, वसमत १५, हयातनगर ६१, गिरगाव ४, हट्टा ७, टेंभुर्णी ७.

इतर बातम्या
नगर जिल्ह्यात ज्वारीची पावणे तीन लाख...नगर : जिल्ह्यामधील बहुतांश भागात गेल्या आठ...
साताऱ्यात जोरदार पावसाने स्ट्रॉबेरीचे...सातारा : जिल्ह्यात अनेक ठिकाणी परतीच्या...
कर्जत- जामखेडमध्ये सर्वांची प्रतिष्ठा...नगर : दोन वेळा मतविभागणीमुळे पालकमंत्री राम शिंदे...
मराठवाड्यात ११० मंडळांत पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ पैकी ११०...
मुळशी तालुक्यात परतीच्या पावसामुळे...कोळवण : मुळशी तालुक्यात परतीच्या पावसामुळे...
परभणी येथील दुग्धशाळेतील दूध संकलनात घटपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
मराठवाड्यातील ५३१ गावांत, वाड्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील ५३१ गावे-वाड्यांची तहान...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड  : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड,...
मनमाड बाजार समितीमध्ये नवीन मका विक्री...नाशिक : नांदगाव तालुक्यात मका काढणीला सुरवात झाली...
खरीप मळण्यांना पावसाचा फटकाकोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात...
शेतकरीकन्या मंजूषा पगारची भारतीय बेसबॉल...नाशिक : मालेगाव तालुक्यातील विराणे येथील शेतकरी...
खानदेशात ज्वारीची दिवाळीपूर्वी कापणी...जळगाव ः शासनाकडून भरडधान्य म्हणजेच ज्वारी, मका...
व्यापाऱ्यांकडून मुगाची कमी भावाने खरेदीनांदुरा, जि. बुलडाणा : पावसाने उघडीप दिल्याने...
‘पंदेकृवि’मध्ये जागतिक कापूस दिन साजराअकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात...
तरुणांनी शेतीला पूरक उद्योगाची जोड...सोलापूर ः ‘‘उद्योजकता प्रशिक्षणातून शेतीपूरक...
परतीचा प्रवास वेगाने; मध्य, पूर्व...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून)...
सोयाबीन उत्पादनासाठी गंधकाचा वापर...अकोला ः शेतातील काडी कचरा न जाळता खत...
को-मार्केटिंगची पायाभरणी करणारा माजी...पुणे : "राज्यातील शेतकऱ्यांना को-मार्केटिंगच्या...
सातारा : उसावर अमेरिकन लष्करी अळीचा...सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पडणाऱ्या...