पुणे : पाणलोटातील पावसामुळे धरणांतून विसर्ग वाढला

पाणलोटातील पावसामुळे धरणांतून विसर्ग वाढला
पाणलोटातील पावसामुळे धरणांतून विसर्ग वाढला

पुणे : पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात गुरुवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्व धरणे भरली असल्याने पावसाचा जोर वाढताच धरणातून पुन्हा पाणी सोडवे लागले. शुक्रवारी (ता. १३) सकाळी खडकवासला, मुळशी, पवना, वीरसह अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. उजनी धरणही शंभर टक्के भरल्याने धरणातून विसर्ग वाढवावा लागणार आहे. 

गुरुवारी दुपारपासून धरण क्षेत्रात मध्यम पावसाला सुरवात झाल्यानंतर रात्रभर जोर वाढला होता. शुक्रवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत टेमघर धरण क्षेत्रात ३० मिलिमीटर, वरसगाव ३८, पानशेत ४१, खडकवासला ९, पवना ३५, कासारसाई १४, मुळशी १९, कळमोडी ३३, भामा आसखेड १२, आंद्रा २३, वडीवळे ४०, पिंपळगाव जोगे २८, माणिकडोह ३२, येडगाव ३५, वडज १८, गुंजवणी २७, नीरा देवघर धरण क्षेत्रात २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक धरणातून जमा होत असल्याने शुक्रवारी (ता. १३) दुपारी १२ वाजता खडकवासला धरणातून १३ हजार ९८१ क्युसेक, मुळशी धरणातून ५ हजार १३० क्युसेक, वीर धरणातून १३ हजार ९६१, वरसगाव ४ हजार ४४०, पानेशत ९९०, गुंजवणी १ हजार ८५०, नीरा देवघर ३ हजार ३६६, भाटघर ७००, पिंपळगाव जोगे ५००, माणिकडोह १ हजार ५०, भामा असखेड २ हजार ७४, वडीवळे १ हजार ३७६, आंद्रा १ हजार ६२०, कासारसाई २००, टेमघर ३६३ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे पुणे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com