Agriculture news in marathi, Due to the rains, the arrival of jaggery in Kolhapur has reduced | Agrowon

पावसामुळे कोल्हापुरात गुळाची आवक घटली

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे बाजार समितीत गुळाच्या आवकेवर विपरीत परिणाम झाला आहे. चार दिवसांपूर्वी दररोज होणारी दहा हजार गूळ रव्यांची आवक मंगळवारी (ता. २२) केवळ तीन हजार गूळ रव्यांवर आली आहे. आणखी दोन ते तीन दिवस सलग पाऊस झाल्यास गुळाची आवक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

कोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे बाजार समितीत गुळाच्या आवकेवर विपरीत परिणाम झाला आहे. चार दिवसांपूर्वी दररोज होणारी दहा हजार गूळ रव्यांची आवक मंगळवारी (ता. २२) केवळ तीन हजार गूळ रव्यांवर आली आहे. आणखी दोन ते तीन दिवस सलग पाऊस झाल्यास गुळाची आवक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

यंदा महापुरामुळे गुऱ्हाळांची अवस्था बिकट झाली. गुऱ्हाळघरांचे माहेरघर असणाऱ्या करवीर तालुक्‍यातील ८० टक्के गुऱ्हाळे पाण्याखाली गेली. बहुतांशी गुऱ्हाळघरांसाठी ठेवण्यात आलेले जळण (उसाचे वाळलेले चिपाड) खराब झाल्याने गुऱ्हाळ सुरू करायचे म्हणले तरी जळणाचे करायचे काय असा प्रश्‍न निर्माण झाला. महापुरानंतर पंधरा दिवस चांगले ऊन पडल्याने गुऱ्हाळघर मालकांनी जळण वाळविण्यास सुरवात केली. यामुळे दसऱ्याच्या दरम्यान काही प्रमाणात गुऱ्हाळे सुरू झाली. परंतु, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी जोरदार पाऊस होत असल्याने याचा फटका गुऱ्हाळघर मालकांना बसत आहे.

वाळविण्यासाठी पसरवलेले जळण पावसाने भिजत असल्याने गुऱ्हाळघरे सुरू करणे आव्हान बनले आहे. यातच शिवारामध्ये पाणी साचत असल्याने ऊस तोडणी करणेही अशक्‍य होत असल्याने आठवड्यापूर्वी धीम्या गतीने सुरू असलेली गुऱ्हाळे पुन्हा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

बाजार समितीत दररोज घटणारी गुळाची आवक चिंताजनक बनत आहे. बाजार समितीचे सचिव मोहन सालपे म्हणाले, की गेल्या चार दिवसांत गुळाच्या आवकेत घट होत आहे. १८ ऑक्‍टोबरला दहा हजार गूळ रव्यांची आवक होती. त्यानंतर सलग दोन तीन दिवस पाऊस झाला. यामुळे ही आवक आठ हजार, पाच हजारापर्यंत घसरली. मंगळवारी (ता. २२) तर ही आवक तीन हजारांपर्यंत खाली आली. सातत्यपूर्ण पावसामुळे गुळाचीही प्रतही खराब होत असल्याने हा एक दुसरा धोकाही गूळ उत्पादकांपुढे उभा आहे.


इतर अॅग्रोमनी
अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन नवी दिल्ली: देशात यंदा खरीप हंगामात...
राज्यातील रेशीम बाजारात १० कोटींची...नागपूर ः राज्यात रेशीमकोष खरेदी बाजारपेठेला...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
गेल्या वर्षीच्या साखर निर्यातीसाठी...कोल्हापूर : गेल्या वर्षीची (२०१८-१९) साखर निर्यात...
आंतरराष्ट्रीय डाळ परिषदेकडे उद्योजकांचे...पुणे  : जागतिक कडधान्य उत्पादन व बाजारपेठेला...
कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढकोल्हापूर : जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात...
साखरेच्या दुहेरी किमतीसाठी सूत्र तयार...नवी दिल्ली: साखरेचे घसरणारे दर स्थिर...
आंतरपिकांतून कुटुंबाचे अर्थकारण केले...माचले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील दीपक माणिक...
खानदेशात १२ लाख गाठी बाजारात कापसाची आवकजळगाव : कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
ब्राझील भारताकडून गव्हासह भरडधान्य...नवी दिल्ली: दोन्ही देशांच्या कृषिमंत्र्यांमध्ये...
हरभरा, सोयाबीन वगळता सर्व पिकांच्या...खरीप पिकाच्या उत्पादनात जरी घट अपेक्षित असली तरी...
खाद्यतेल आयात शुल्क कमी कराः ग्राहक...नवी दिल्ली: देशांतर्गत वाढलेले खाद्यतेलाचे...
खाद्यतेल बाजारात सटोडियांकडून खोड्याचा...पुणे : खाद्यतेलासह तेलबिया वायदे बाजारात सध्या...
नव्या बेदाण्यास १७५ रुपये दर तासगाव, जि. सांगली ः तासगाव कृषी उत्पन्न बाजार...
कापड गिरण्या बाजारातून कापूस खरेदीस...मुंबई ः साउथ इंडियन मिल्स असोसिएशनने केंद्रीय...
देशात साखर उत्पादनात २६ टक्के घटनवी दिल्ली ः देशात १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर...
साखर दराची दुहेरी पद्धत ठरवाकोल्हापूर : साखर उद्योगाला बळकटी आणण्यासाठी...
जालन्यात रेशीम कोषाला मिळाला ५०० रुपये...जालना : येथील बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष...
तादंळाच्या आफ्रिकेतील बाजारपेठेवर चीनचा...नवी दिल्ली : तांदळाची आयात करणारा देशच आता...
खान्देशची केळी निर्यातीत आघाडीकेळीने जगात जळगावला मोठी ओळख दिली आहे. ही ओळख...