agriculture news in marathi, Due to the rains in Dhule, Jalgaon and Nandurbar districts, the farmers are happy | Agrowon

धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत पावसामुळे शेतकरीराजा सुखावला
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 जून 2019

जळगाव : खानदेशात धुळे जिल्ह्यासह जळगाव, नंदुरबामध्ये अनेक ठिकाणी रविवारी (ता. २३) मध्यरात्री व सोमवारी (ता. २४) जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती आहे. शेतकरीराजा सुखावला असून, पेरणीच्या तयारीत आहे. परंतु सोयाबीन, कापूस, ज्वारी आदी पिकांची पेरणी किमान ५० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

जळगाव : खानदेशात धुळे जिल्ह्यासह जळगाव, नंदुरबामध्ये अनेक ठिकाणी रविवारी (ता. २३) मध्यरात्री व सोमवारी (ता. २४) जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती आहे. शेतकरीराजा सुखावला असून, पेरणीच्या तयारीत आहे. परंतु सोयाबीन, कापूस, ज्वारी आदी पिकांची पेरणी किमान ५० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

पावसाच्या दमदार आगमनाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. काही शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली होती; परंतु त्यावर जोरदार सरी बरसण्यासाठी शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले होते. धुळे जिल्ह्यात शिरपूर, शिंदखेडा, धुळे भागांत अनेक महसूल मंडळांमध्ये सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत २० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. नंदुरबार जिल्ह्यातही तळोदा, शहादा भागात जोरदार पाऊस झाला. शहादा येथे १८ मिलिमीटर, तळोदा येथे २० मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती मिळाली.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, जळगाव, जामनेर, धरणगाव, मुक्ताईनगर, भुसावळ, पाचोरा, अमळनेर, पारोळा, चाळीसगाव, बोदवड भागांतही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जळगावात १८, रावेरात १२, चोपडा येथे २० मिलिमीटर पावसाची सोमवारी सकाळपर्यंत नोंद झाल्याची माहिती मिळाली. नदी, नाले वाहत नसले तरी पूर्वहंगामी कापूस, वेलवर्गीय पिकांच्या सिंचनासंबंधीची कटकट अनेक ठिकाणी मिटली आहे. कापूस व इतर पिकांमधील तण नियंत्रण व खते देण्याचे काम शेतकऱ्यांनी सोमवारी हाती घेतले. 

पेरणीसाठी जोरदार पाऊस पडू द्या

कापूस, सोयाबीन, ज्वारी पेरणीची मुदत अजून आहे. यामुळे पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करू नये. जोरदार पाऊस अनेक ठिकाणी झालेला नाही. सोयाबीन, ज्वारी, कापसाची पेरणी ५० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय करू नये, असे कृषी विभागाने म्हटले आहे.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...