सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे तूर, सोयाबीनसह बागांचे नुकसान

सोलापूर  जिल्ह्यात पावसामुळे तूर, सोयाबीनसह बागांचे नुकसान
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे तूर, सोयाबीनसह बागांचे नुकसान

सोलापूर : परतीच्या पावसाने जिल्ह्यात अनेक भागांत दमदार हजेरी लावली. पण, या पावसाने खरिपातील काही पिके आणि रब्बीतील नव्याने पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान झाले. विशेषतः तूर, सोयाबीन या पिकांसह डाळिंब, द्राक्ष यांसारख्या फळबागांच्या क्षेत्रांनाही फटका बसला. करमाळा, माढा, पंढरपूर, बार्शी, मोहोळ आणि सांगोला तालुक्‍यांत हे नुकसान झाले. 

जिल्ह्यात यंदा पावसाने खूपच उशिरा हजेरी लावली. जवळपास जून ते सप्टेंबरपर्यंत पावसाने प्रदीर्घ ओढ दिली. अनेक भागात पाऊस पडला, पण तो दमदार पडलाच नव्हता. पण या महिन्यात विशेषतः गेल्या पाच-सहा दिवसांत मात्र पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे काहीसे समाधान असले, तरी पिकांचे मोठे नुकसान झाले. बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ भागातील तूर, सोयाबीन या पिकांना यामध्ये सर्वाधिक फटका बसला.

पंढरपूर, सांगोल्यात द्राक्ष आणि डाळिंबावर त्यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाने डाळिंबाची फूलगळती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सेटिंग झालेल्या डाळिंबावर काळे डाग येऊ लागल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. बोरामध्येही गळती वाढली आहे. परिणामी, आता उत्पादनात घट येण्याची शक्‍यता आहे. मोहोळ, माढा भागातही अशीच काहीशी स्थिती आहे. पोफळज (ता. करमाळा) येथे पाझर तलावातील पाणी शेतकऱ्याच्या शेतात पसरल्याने पिकांचे नुकसान झाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com