agriculture news in marathi Due to rains in Satara district Major damage to rabi crops | Agrowon

सातारा जिल्ह्यात पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 जानेवारी 2021

सातारा : जिल्ह्यात सोमवारी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांचे नुकसान झाले. मंगळवारी (ता. ५) सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. 

सातारा : जिल्ह्यात सोमवारी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांचे नुकसान झाले. मंगळवारी (ता. ५) सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. 

जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. सोमवारी (ता.४) पहाटेपासून माण तालुक्यातील म्हसवड परिसरात हलक्या पावसास सुरवात झाली. त्यानंतर खटाव, सातारा, कोरेगाव तालुक्यातही पावसाचा शिडकावा झाला. हलक्या पावसामुळे कामे ठप्प झाली.

सोमवारी रात्री अनेक ठिकाणी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी पिके आडवी झाली. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा तालुक्याचा रब्बी हंगाम प्रमुख असल्याने या तालुक्यात पेरणीही मोठ्या प्रमाणात झाली आहे.

वाऱ्यामुळे रब्बी ज्वारी आडवी झाल्यानेही नुकसान झाले. पावसामुळे आंब्याचे मोहर झडण्याबरोबर वेलवर्गीय पिकांना भुरी, गहू, हरभरा पिकांवर तांबेरा, तर टोमॅटोवर करपाच्या प्रादुर्भावाच्या शक्यतेने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. 
 


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...