शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांचा तीन हेक्टर ऊस जळून खाक

सायखेडा, जि. नाशिक : निफाडतालुक्यातील शिंगवे येथे उसाच्या शेतात आग लागली. त्यामुळे तीन हेक्टर ऊस जळून खाक झाला. परिणामी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला.
Due to short circuit, farmers burnt three hectares of sugarcane
Due to short circuit, farmers burnt three hectares of sugarcane

सायखेडा, जि. नाशिक : निफाड  तालुक्यातील शिंगवे येथे उसाच्या शेतात आग लागली. त्यामुळे तीन हेक्टर ऊस जळून खाक झाला. परिणामी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. 

शेतकरी बन्सीलाल खंडेराव डेर्ले यांच्या शेतीमधील एक हेक्टर तसेच शहाजी मधुकर डेर्ले यांच्या शेतीमधील दोन हेक्टर उसाचे नुकसान झाले. वीज तारांचे घर्षण होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली.

शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण आगीने उग्र रूप धारण केल्याने शेतकऱ्यांचे प्रयत्न असफल झाले. काही अंशी आग आटोक्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.  नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली.

वीज तारांच्या दुरुस्तीची मागणी

शिंगवेसह गोदाकाठ परिसरातील शिवारांमध्ये वीज तारा लोंबकळत असलेल्या दिसतात. महावितरण कंपनीकडे तक्रारी करूनही कार्यवाही झाली नाही. त्वरित वीज तारांची दुरुस्ती कराण्याची मागणी होत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com