Agriculture news in marathi, Due to soybean harvesting in Parbhani, Hingoli, there is a shortage of laborers | Agrowon

परभणी, हिंगोलीत सोयाबीन काढणीमुळे मजुरांची वानवा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 ऑक्टोबर 2021

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सोयाबीन काढणीच्या कामांमुळे इतर शेती कामांसाठी मजूर मिळेनात. अनेक भागांत शेतात पाणी साचलेले आहे. त्यामुळे कापूस वेचणीची कामे खोळंबली आहेत. परिणामी, बोंडातून फुटलेला कापूस गळून पडत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सोयाबीन काढणीच्या कामांमुळे इतर शेती कामांसाठी मजूर मिळेनात. अनेक भागांत शेतात पाणी साचलेले आहे. त्यामुळे कापूस वेचणीची कामे खोळंबली आहेत. परिणामी, बोंडातून फुटलेला कापूस गळून पडत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

यंदा परभणी जिल्ह्यात १ लाख ८१ हजार १५५ हेक्टर आणि हिंगोली जिल्ह्यात ३० हजार ६५४ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. जूनच्या सुरवातीला लागवड केलेल्या तसेच लवकर येणाऱ्या वाणाच्या कपाशीची जवळपास सर्वच बोंडे आहेत. अतिवृष्टीमुळे सखल, पाणथळ जमिनीवरील पिकांमधील पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे जमिनीलगतच्या सर्व फांद्यांची बोंडे सडली आहेत. सततच्या पावसामुळे बोंडातून फुटलेला कापूस झा़डावरच भिजला. सरकीला कोंब फुटले. धागे पिवळे पडले आहेत. उन्हामुळे ओलावा कमी झाल्यानंतर बोंडातून मोकळा झालेला कापूस पाण्यात पडत आहे.

भिजल्यामुळे कापसाच्या दर्जावर परिणाम झाला आहे. त्यास कमी दर मिळून शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. दोन एकरांवरील कपाशीची जवळपास सगळीच बोंडे फुटली आहेत. परंतु सोयाबीन काढणीमुळे कापूस वेचणीच्या कामासाठी मजूर मिळेनात. फुटलेला कापूस पावसात भिजून नुकसान झाले आहे.
- बाजीराव शेवाळे, गणपूर, जि. परभणी
 


इतर बातम्या
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये...कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री...
वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो...अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
उसाच्या तोडणीला कोल्हापुरात सुरुवातकोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन...नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
हिरापुरात कापसाची पाण्यातच वेचणीपारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने...
मालेगाव तालुक्यात ऊस जळून खाककळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे...
पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर...पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी...वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा भरपाईची...नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून सहा लाख...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
बुलडाण्यात ८९ हजार हेक्टर बाधितबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन दिवस...