agriculture news in Marathi, Due to spending 50 crores in Morshi taluka, there was a drought | Agrowon

मोर्शी तालुक्‍यात ५० कोटी खर्चूनही दुष्काळस्थिती कायम
विनोद इंगोले
बुधवार, 15 मे 2019

अमरावती ः संत्रा लागवडीमुळे विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या मोर्शी तालुक्‍यात जलयुक्‍त शिवारात ५० कोटींची कामे झाली. परंतु, त्यानंतरही या तालुक्‍याच्या माथी असलेला ड्रायझोनचा कलंक आणि दुष्काळीस्थिती कायम असल्याने हा खर्च पाण्यात गेल्याचा आरोप होत आहे. 

अमरावती ः संत्रा लागवडीमुळे विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या मोर्शी तालुक्‍यात जलयुक्‍त शिवारात ५० कोटींची कामे झाली. परंतु, त्यानंतरही या तालुक्‍याच्या माथी असलेला ड्रायझोनचा कलंक आणि दुष्काळीस्थिती कायम असल्याने हा खर्च पाण्यात गेल्याचा आरोप होत आहे. 

वरुड, मोर्शी तालुक्‍यांत संत्रा लागवड सर्वाधिक आहे. या भागात पाणीउपसा झाल्याने हे दोन्ही तालुके ड्रायझोन घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे या भागात बोअरवेलवरदेखील बंदी लादण्यात आली. यातील मोर्शी तालुक्‍यात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांशी उपक्रम असलेल्या जलयुक्‍त शिवार अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. २०१५ ते २०१८ या तीन आर्थिक वर्षात ८३ गावे अभियानात समावेशीत होती. या ८३ गावांमध्ये २१४२ कामांना मान्यता देण्यात आली. यापैकी २१२२ कामे पूर्ण करण्यात आली. संपूर्ण ८३ गावे जलपरिपूर्ण झाली. त्यावर ४४ कोटी ७७ लाख रुपयांचा खर्च झाल्याचा दावा कृषी विभाग करीत आहे. 

२०१८-१९ या आर्थिक वर्षात तालुक्‍यातील २५ गावे निवडत त्यातील २५६ कामांना मान्यता देण्यात आली. ४ कोटी ९० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता यासाठी दिली गेली. यानुसार मागील चार वर्षांत सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी जलयुक्‍त अभियानात खर्ची घालण्यात आला. ड्रायझोनच्या परिस्थितीत सुधारणा तर दूरच यावर्षी तालुक्‍यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहेत. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याऐवजी जलयुक्‍तचा निधी अधिकाऱ्यांनी मुरविल्याचा आरोपदेखील यापार्श्‍वभूमीवर केला जात आहे. २०१७-१८ मध्ये तालुक्‍यातील ६४ गावांमध्ये नाला सरळीकरण व खोलीकरणावर ६२ लाख रुपये खर्च करण्यात आले. जीएसडीएद्वारे रिचार्ज शिफ्टकरिता १२ गावांमध्ये १२० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. यावर सुमारे ३७ लाख रुपयांचा खर्च झाला.

रोजगार हमी योजनेअंतर्गत ८६९ सिंचन विहिरींचे बांधकाम पूर्ण झाल्याचा दावा अधिकारी करतात. मग तालुक्‍यातील ५० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तालुक्‍यात बोअरवेलवर बंदी असतानाही त्या अनधिकृतपणे खोदल्या जात आहेत. ८०० ते १२०० फुटापर्यंत बोअर घेतल्या जातात. त्याचाही परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. 

धरण उशाशी तालुका मात्र ड्रायझोनमध्ये 
वॉटरकप स्पर्धाही याच तालुक्‍यात घेण्यावर भर देण्यात आला. उशाशी अप्पर वर्धा धरण असतानाही तालुक्‍याच्या माथी असलेला ड्रायझोनचा कलंक तसाच आहे. तालुक्‍यात यापूर्वी कोल्हापूरी बंधारे व शेकडो सिमेंट प्लग घेण्यात आले. परंतु, दुरुस्तीअभावी ते अंतिम घटका मोजत आहेत.
 

इतर बातम्या
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...