Agriculture news in marathi Due to stormy rain in Osmanabad Disadvantages of fruits, vegetables | Agrowon

उस्मानाबादमध्ये वादळी पावसामुळे फळपिके, भाजीपाल्याचे नुकसान

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 एप्रिल 2020

उस्मानाबाद : जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढला असून सोमवारी (ता.२०) पहाटेही जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. लॉकडाउनमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना आता अवकाळी पावसाचा तडाखा बसतो आहे. 

उस्मानाबाद : जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढला असून सोमवारी (ता.२०) पहाटेही जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. लॉकडाउनमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना आता अवकाळी पावसाचा तडाखा बसतो आहे. 

गत चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची हजेरी लागते आहे. त्यात वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणच्या पिकांची नासाडी केली आहे. शुक्रवारी (ता. १७) झालेल्या वादळी पावसाने केळी बागांचे मोठे नुकसान झाले. तुगाव (ता. उस्मानाबाद) येथील एका शेतकऱ्यांची तीन एकर केळीची बाग उद्ध्वस्त झाली. तर, त्याच दिवशी पळसप (ता. उस्मानाबाद) येथे पहाटे झालेल्या वादळी वाऱ्याने अनेक कुटंबाच्या घरावरील पत्रे उडाले. 

दरम्यान, गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस जिल्ह्यात कुठे न कुठे हजेरी लावतो आहे. सोमवारी पहाटे जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस झाला. तालुक्यातील तेर मंडळात सर्वाधिक ३१ मिलीमीटर पाऊस झाला. बेंबळी मंडळातही ३० मिलमीटर पावसाची नोंद झाली आहे. ढोकी वगळता अन्य महसूल मंडळात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. तुळजापूर तालुक्यातील सावरगाव मंडळातही २८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

शिराढोण परिसरात गारपीट 

कळंब तालुक्यातील शिराढोण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून हजेरी लावत आहे. शनिवारी या परिसरात वादळी वाऱ्यासह सुमारे १६ मिलीमीटर पाऊस झाला. तर सोमवारी (ता. २०) पहाटेही या भागात जोरादार पाऊस झाला. सुमारे ३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वीजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणच्या फलपिकांची नासाडी होत आहे. नायगाव परिसरात सोमवारी पहाटे चांगलीच गारपीट झाली. यामध्ये काही फळपिकांचे नुकसान झाले आहे. 

शहरातही वीजेचा कडकडाट 

उस्मानाबाद शहरातही दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. वीजेचा कडकडाटही जोराचा होता. त्यात वीज गुल झाल्याने नागरिकांची झोपमोड झाली. शहरात सुमारे २० मिलीमीटर पाऊस झाला आहे. 
 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...