Agriculture news in marathi, Due to the 'Swabhimani' agitation, the insurance money in the farmers account | Agrowon

‘स्वाभिमानी’च्या आंदोलनामुळे विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

सोलापूर : मंगळवेढा तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. ८) ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी दोन तासांहून अधिक काळ झालेल्या आंदोलनानंतर अखेर कंपनीने संबंधित ४५१ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले.

सोलापूर : मंगळवेढा तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. ८) ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी दोन तासांहून अधिक काळ झालेल्या आंदोलनानंतर अखेर कंपनीने संबंधित ४५१ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले.

मंगळवेढा तालुक्‍यातील गत हंगामातील पीकविम्याचे पैसे काही शेतकऱ्यांना मिळाले, तर काहींना हप्ता भरूनही ते मिळाले नाहीत. त्यासाठी कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. पण, ही माहिती मिळताच मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांसह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ओरिएंटल कंपनीचे कार्यालय गाठून आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे दिल्याशिवाय आपण मागे हटणार नाही, अशी भूमिका संघटनेच्या नेत्यांनी घेतली. 

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष महामूद पटेल, जिल्हा संघटक विजय रणदिवे, जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील, मंगळवेढा तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, शंकर संघशेट्टी, महादेव येडगे, संतोष पुजारी, महादेव सोड्डी, वसंत मोची, रावसाहेब संपागणगे, सिद्धाराम संघशेट्टी, हाऊशील पुजारी, सतीश सोनलकर, विजय कोरे, बाबू पटेल, भूषण आकळे, निंगप्पा इगळे, महादेव पुजारी यांच्यासह पीकविमाधारक शेतकरी व संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले. 

सुमारे दोन तासांनंतर अधिकारी नमले, त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ४५१ शेतकऱ्यांचे पीकविम्याचे एक कोटी १५ लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केले. उर्वरित शेतकऱ्यांना १५ नोव्हेंबरच्या आत विम्यापोटी साडेचार लाख रुपये देण्याचे लेखी आश्‍वासनही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले.


इतर ताज्या घडामोडी
पदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
महात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून...नगर  ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांमध्ये `कोरोना`...पुणे : निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला जेमतेम २८...
केळी पिकवून विकण्यासाठी अखेर...परभणी : ‘लॅाकडाऊन’मुळे केळीच्या दरात मोठी घसरण...
कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी (ता.५) सायंकाळी...
जनावरांतील उष्माघाताचे नियंत्रणउन्हाच्या संपर्कात आल्यामुळे जनावरांच्या शरीराचे...
अकोल्यात भाजीपाला, फळविक्रीची ११०...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील...
‘वीज दर कपातीत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर...अकोला ः राज्य वीज नियामक आयोगाने नुकतीच उद्योग,...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात फुले...नांदेड : ‘लॅाकडाऊन’मुळे नांदेडसह अन्य ठिकाणच्या...
फूल विक्रीचा व्यवसाय डबघाईस; फेकून...शिरपूरजैन, जि. वाशीम : येथील फूल उत्पादक शेतकरी...
बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायने...नाशिक : द्राक्षापासून बेदाणा निर्मितीसाठी...
नाशिक जिल्ह्यात बेदाणा निर्मितीच्या...नाशिक : ऐन द्राक्ष हंगामाच्या अंतिम टप्प्यात...
मराठवाड्यात फळे, भाजीपाल्याची ८१ हजार...औरंगाबाद : एकीकडे दररोज सकाळीच भरणाऱ्या किरकोळ...
माळीनगरमध्ये आता नीरापासून गुळ उत्पादन लवंग, जि. सोलापूर : सध्या नीरा उत्पादनाचा हंगाम...
आरोग्य कर्मचाऱ्यासांठी सुरक्षेची पूर्ण...नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘कोरोना’...
अमरावती बाजार समितीची ३२ अडत्यांवर...अमरावती ः किरकोळ भाजी विक्री न करण्याचे आदेश...
‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा...मुंबई : ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा,...
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे...सोलापूर : कोरोना विषाणु संसर्गाच्या...
इस्लामपूरकरांना भाजीपाल्यासह साखरवाटप नवेखेड, जि. सांगली : बोरगाव (ता. वाळवा)...
राज्यातील अतिरिक्त १० लाख लिटर दूध...संगमनेर, जि.नगर : कोरोना विषाणूचा...