ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या संपामुळे कामकाज ठप्प

ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या संपामुळे कामकाज ठप्प
ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या संपामुळे कामकाज ठप्प

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करीत आहेत. मात्र, अनेक मागण्या प्रलंबित असल्याने व पाठपुरावा करून सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने राज्यभर संगणक परिचालकांनी सोमवारी (ता. १९) बेमुदत संपाचा एल्गार पुकारला आहे. यास जिल्ह्यातील परिचालकांनी पाठिंबा दर्शविल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतमधील कामकाज ठप्प झाले आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतस्तरावर जनतेला विविध शासकीय दाखले देण्याचे व माहिती ऑनलाइन प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याचे काम संगणक परिचालक करतो. मात्र, हा संप पुरकरल्याने सर्व कामकाज ठप्प झाले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर शासनाने निर्णय द्यावा. सरकारने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने हे आंदोलन असल्याचे सांगण्यात आले आहे.  आंदोलनादरम्यान कुठल्याच प्रकारचे शासकीय-निमशासकीय, खासगी स्वरूपाचे ऑनलाइन तसेच ऑफलाइन काम कुणीही करायचे नाही, असा निर्णय महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने घेतला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. याच आशयाचे निवेदन गुरुवारी (ता. २२) रोजी येवला तालुका ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेने येवला पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी दिले. या वेळी संघटनेने निवेदन देताना महाराष्ट्र संगणक परिचालक संघटनेचे येवला तालुकाध्यक्ष सोपान सुरासे, उपाध्यक्ष सचिन मगर, सरचिटणीस भाऊसाहेब गाढे, सल्लागार दत्तू शेलार, मारुती खैरनार, अंकुश म्हस्के, प्रवीण शेळके, गणेश कुदळ, योगेश शेजवळ, कृष्णा गायकवाड, समाधान मखरे, अरुण मोरे, विशाल आरखडे आदी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com