Agriculture news in marathi; Due to the termination of the Gram Panchayat computer operators, the work stalled | Agrowon

ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या संपामुळे कामकाज ठप्प
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करीत आहेत. मात्र, अनेक मागण्या प्रलंबित असल्याने व पाठपुरावा करून सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने राज्यभर संगणक परिचालकांनी सोमवारी (ता. १९) बेमुदत संपाचा एल्गार पुकारला आहे. यास जिल्ह्यातील परिचालकांनी पाठिंबा दर्शविल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतमधील कामकाज ठप्प झाले आहे.

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करीत आहेत. मात्र, अनेक मागण्या प्रलंबित असल्याने व पाठपुरावा करून सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने राज्यभर संगणक परिचालकांनी सोमवारी (ता. १९) बेमुदत संपाचा एल्गार पुकारला आहे. यास जिल्ह्यातील परिचालकांनी पाठिंबा दर्शविल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतमधील कामकाज ठप्प झाले आहे.

ग्रामीण भागातील ग्रामपंचायतस्तरावर जनतेला विविध शासकीय दाखले देण्याचे व माहिती ऑनलाइन प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याचे काम संगणक परिचालक करतो. मात्र, हा संप पुरकरल्याने सर्व कामकाज ठप्प झाले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर शासनाने निर्णय द्यावा. सरकारने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने हे आंदोलन असल्याचे सांगण्यात आले आहे. 

आंदोलनादरम्यान कुठल्याच प्रकारचे शासकीय-निमशासकीय, खासगी स्वरूपाचे ऑनलाइन तसेच ऑफलाइन काम कुणीही करायचे नाही, असा निर्णय महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने घेतला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याच आशयाचे निवेदन गुरुवारी (ता. २२) रोजी येवला तालुका ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेने येवला पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी दिले. या वेळी संघटनेने निवेदन देताना महाराष्ट्र संगणक परिचालक संघटनेचे येवला तालुकाध्यक्ष सोपान सुरासे, उपाध्यक्ष सचिन मगर, सरचिटणीस भाऊसाहेब गाढे, सल्लागार दत्तू शेलार, मारुती खैरनार, अंकुश म्हस्के, प्रवीण शेळके, गणेश कुदळ, योगेश शेजवळ, कृष्णा गायकवाड, समाधान मखरे, अरुण मोरे, विशाल आरखडे आदी उपस्थित होते.
 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
औरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरणमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६...
मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...
अकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला  ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...
ग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...
हिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...
नरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर  : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...
रेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...
परभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...
पुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...
शरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...
मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...