Agriculture news in Marathi Due to untimely fall, there is a rush in the vineyards | Page 4 ||| Agrowon

अवकाळीच्या सावटामुळे द्राक्ष पट्ट्यात धाकधूक

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021

गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादक अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडले आहेत. अशातच मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने अवकाळीच्या सावटामुळे पूर्वहंगामी द्राक्ष पट्ट्यात धाकधूक वाढली आहे.

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादक अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडले आहेत. अशातच मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने अवकाळीच्या सावटामुळे पूर्वहंगामी द्राक्ष पट्ट्यात धाकधूक वाढली आहे.

‘अधिक जोखीम अधिक दर’ या पद्धतीने शेतकरी सटाणा, देवळा, मालेगाव, चांदवड व कळवण तालुक्याच्या काही भागात पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन घेतले जाते. गेल्या एक महिन्यापासून पूर्वहंगामी द्राक्ष काढणीच्या कामांना वेग आला आहे. ढगाळ वातावरणासहीत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याने अवकाळीच्या सावटाखाली शेतकरी आहे.पूर्वहंगामी द्राक्ष शेतीला दुप्पटचा खर्च येत असल्याने आव्हानांना समोर जावे लागत आहे. अनेक संकटात पुन्हा एकदा उमेदीने सलग तिसऱ्या वर्षी दृष्ट लागावी अशा बागा तयार केल्या. मात्र, उत्पादन घेऊन मातीमोल होण्याची भीती आहे. पूर्वहंगामी द्राक्ष पिकाचा कालावधी डिसेंबरअखेर असतो. त्यामुळे चालू वर्षांपासून लागू केलेला द्राक्ष हंगामाचा जोखीम काळ १ जुलै ते ३० डिसेंबर धरण्यात यावा, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात आजही पाणी 
नुकसान होऊन भरपाई व उपाययोजना नसल्याची ओरड शेतकऱ्यांची आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये शेकडो एकर तयार द्राक्ष माल वेलीवरच मातीमोल झाला. तयार मालाला तडे जाऊन सड झाली. हे नुकसान झाल्यानंतर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, तत्कालीन केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांसह शासकीय यंत्रणेनेद्वारे झाले. मात्र, काहीच पदरी न पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आजही पाणी आहे.शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून फुकटचे नको मात्र शाश्वत पर्याय द्या, अशी मागणी होऊ लागली आहे. 

एकीकडे पदरमोड करून पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन घ्यायचे त्यात होणारे नुकसान न सोसणारे आहे. राज्य सरकारकडे आच्छादनासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पिकवून सुद्धा अडचणीत आहोत. द्राक्ष शेती संकटात सापडल्याची स्थिती आहे. त्यामुळे द्राक्ष क्षेत्र कमी होण्याची भीती आहे.
- कृष्णा भामरे, माजी संचालक, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

नाशिक जिल्ह्यात ३० नोव्हेंबरनंतर २ डिसेंबरदरम्यान मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता जाणवते. या काळात काढणीस आलेल्या द्राक्ष बागावर रूफ-टॉप-कव्हर सुविधा असल्यास बाग अच्छादित करावे तर खरीप लाल कांदा ३ तारखेनंतर काढावा. 
- माणिकराव खुळे, निवृत्त हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान विभाग, पुणे


इतर अॅग्रो विशेष
जमीन सुपीकता, पीक फेरपालट हेच सूत्रअनियंत्रित पाणी, खतमात्रा वापरामुळे जमीन सुपीकता...
‘मध क्लस्टर’ निर्मितीसाठी सर्वतोपरी मदत...नाशिक : मधमाशीपालन हे अतिरिक्त रोजगाराचे साधन...
विलंब ‘एफआरपी’चे व्याज  कारखान्यांना...नांदेड : शेतकऱ्यांसोबत बेकायदा करार करून एफआरपीचे...
सोयाबीनसाठी चीनची अमेरिकेवर मदार? पुणे ः ब्राझील आणि अर्जेंटिनात यंदा सोयाबीन...
राज्यात गारठा पुन्हा वाढणार पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...
महावितरण विरोधात कऱ्हाडमध्ये शुक्रवारी...कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांना बोगस, चुकीची...
द्राक्ष दराच्या निर्णयाची अंमलबजावणी...नाशिक : निर्यातक्षम द्राक्ष मालाच्या उत्पादन...
यंदा डाळिंब निर्यातदार  शेतकरी...सांगली ः राज्यातून डाळिंबाची निर्यात वाढण्यासाठी...
फळबाग लागवडीसाठी  आता सुधारित योजना पुणे ः फलोत्पादन वाटचालीत रोहयो फळबाग लागवडीनंतर...
कोविडमुक्त गाव अभियान पुणे विभागातही...पुणे : जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने...
ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामांबाबत...अकोला ः राज्यातील ग्रामसेवकांकडे असलेली अतिरिक्त...
दळणासाठी नदीतून जीवघेणा प्रवासतळोदा, जि. नंदुरबार : सातपुड्यातील सावऱ्या दिगर...
वाळूदर येतील आवाक्यात  लिलाव कालावधी...मुंबई : राज्यात वाळूचा मुबलक पुरवठा आणि दरांमध्ये...
नगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवडनगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला...
तेलकट डागविरहित डाळिंब अन् बारमाही...तेलकट डाग, सूत्रकृमी किंवा अन्य कारणांमुळे...
भात उत्पादक शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल...गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून कृषी तज्ज्ञ...
उसाच्या थकीत बिलासाठी तासगावात आंदोलनसांगली ः तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत...
चिखलदऱ्याच्या कॉफीला राज्यभरातून मागणीचिखलदरा, जि. अमरावती : कॉफी संपूर्ण महाराष्ट्रात...
बुलडाण्यातील शेतकरी पिकवतोय...बुलडाणा ः स्ट्रॉबेरी म्हटली की थंड वातावरणात...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढला असल्याने अनेक...