agriculture news in marathi Due to untimely sowing in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात अवकाळीमुळे दाणादाण

टीम अॅग्रोवन
रविवार, 21 मार्च 2021

नाशिक: जिल्ह्याच्या अनेक भागात सकाळी उन्हाचा चटका कायम होता. मात्र दुपारनंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास अनेक भागात गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा दाणादाण झाली.

नाशिक: जिल्ह्याच्या अनेक भागात सकाळी उन्हाचा चटका कायम होता. मात्र दुपारनंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास अनेक भागात गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा दाणादाण झाली. चांदवड, कळवण, देवळा तालुक्यात हलक्या सरी झाल्या. तर निफाड, सटाणा तालुक्यात जोरदार पावसासह मध्यम आकाराच्या गारा पडल्या. 

सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा ही पिके सोंगणीच्या अवस्थेत आहेत. तर द्राक्ष काढणी हंगाम ऐन मोसमात आहे. शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. द्राक्ष पिकाच्या प्रतावरीत अडचणी वाढण्याची शक्यता आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंतसह पालखेड मिरची, लोणवाडी, पाचोरे, शिरवाडे वणी, डावचवडी, आहेरगाव भागात गारांसह १५ ते २० मिनिटे गारांसह जोरदार पाऊस झाला. मात्र निफाड तालुक्याच्या गोदकाठ व पूर्व भागात पाऊस झाला नाही. पिंपळगाव बसवंत परिसरात जोरदार गारांसह पाऊस झाला. रस्त्यावरून पाणी वाहिले.

सटाणा तालुक्याच्या पश्चिम व उत्तर भागात, करंजाडी खोऱ्यात भुयाने, अंतापूर, तहाराबाद आदी परिसरात पाऊस झाला. कांदा पिकासह गहु व हरभऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. कळवण तालुक्यातील काही भागात हलक्या सरी झाल्या. चांदवड तालुक्याच्या पश्चिम भागात तुरळक थेंब पडले. येवला तालुक्यात ढगाळ वातावरण होते. 

‘‘पिंपळगाव बसवंत परिसरात द्राक्ष मण्यांना तडे जाणे, निर्यातक्षम बागांमध्ये घडांचे कागद फाटण्यासह तयार मालाची प्रतवारी बिघडण्याची दाट शक्यता आहे. सध्या परिसरातील द्राक्ष उत्पादकांचे ३० ते ४० टक्के नुकसान झाले. ऊन पडल्यास ही समस्या कमी होईल, अन्यथा नुकसान वाढेल’’, अशी माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय सचिव अरुण मोरे यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...