agriculture news in marathi, Due to water scarcity fruit trees in danger in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा संकटात
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 जून 2019

मागील वर्षांपासून पाऊस नसल्याने डाळिंब बागेसाठी पाणी विकत घेत होतो. तरीही ते पुरत नव्हते. पाणी विकतसुद्धा मिळेना. अखेर पर्याय नसल्याने ३ एकर बाग तोडण्याचा निर्णय घेतला.  
- संजय बच्छाव, वाके, ता. मालेगाव.

नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र यंदा दुष्काळाचा विपरीत परिणाम फळबागांवर झाला आहे. द्राक्ष बागांमध्ये सबकेन झाल्यांनतर अनेक ठिकाणी बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रामुख्याने जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळाचा परिणाम दिसून येत आहे. सिंचनासाठी पुरेसे पाणी नसल्याने बागा जगविणे जिकरीचे झाले आहे. 

जिल्ह्यातील मालेगाव, सिन्नर, येवला, नांदगाव, चांदवड, बागलाण तालुक्यांतील फळबागा पाण्याआभावी वाळून जात आहेत. ज्याच्याकडे भांडवल उपलब्ध आहे, असे शेतकरी विकत पाणी घेऊन बागा वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दुष्काळामुळे विहारींनी तळ गाठल्याने बागा जगवायच्या कशा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डाळिंब, चिकू, सीताफळ, पेरू, लिंबू बागा मोठ्या प्रमाणावर वाळून गेल्या आहेत. या संकटामुळे अस्वस्थ झालेल्या बागायतदारांनी फळबागा तोडण्याचा निर्णय घेतला आहे. डाळिंब पिकाला वाचवून दोन पैसे करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी संघर्ष केला. मात्र तो निष्फळ ठरला आहे. पाणीसाठा संपल्याने अनेक शेतकऱ्यांनी विकतचे पाणी घेऊन बागा जगविल्या. मात्र लाखो रुपये खर्च करून हाती काहीच नाही. दुष्काळमुळे बागांवर कुऱ्हाड चालविण्याची मोठी नामुष्की शेतकऱ्यावर आली आहे.

मालेगाव व बागलाण तालुके डाळिंब उत्पादनात आघाडीवर होते. मात्र तेल्या रोगाच्या पाठोपाठ पाणीटंचाईचे ग्रहण बागांना लागले आहे. यामुळे फळबागा लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत. त्यामुळे आगामी दिवसात फालोत्पाद्नावर मोठा परिणाम होणार आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ९९ टक्‍क्‍...सातारा ः जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी; तसेत...
परभणी जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये...परभणी ः दोन वर्षांच्या खंडानंतर परभणी जिल्ह्यात...
‘स्वाभिमानी’चे ठिय्या आंदोलन सुरू  सातारा ः जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना...
परभणी जिल्ह्यात रब्बीचे सव्वापाच टक्के...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०१९-२०) रब्बी...
पुणे ः नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे...पुणे ः गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी...
जालना : निर्यातक्षम द्राक्षांच्या...जालना : निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी...
लडाखला उभारणार सेंद्रिय शेती संशोधन...पुणे ः विविध शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनावर...
नगर जिल्ह्यामध्ये २४१ वैयक्तिक पाणी...नगर ः वीस दिवस सतत पाऊस पडल्याने पाणीपातळी वाढली...
शेतकऱ्यामुळे टळला रेल्वे अपघात ! नगर : मनमाड-दौंड रेल्वेरुळाला विळद-देहरे गावच्या...
अतिपावसाने नगरमधील शेतजमिनी चिबडल्यानगर  : अतिपावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले...
नांदेड जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवरील...नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या...
वर्धा जिल्ह्यातील ६०० हेक्‍टरवरील ...वर्धा  ः जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे...
दक्षिण महाराष्ट्रातील साखर...कोल्हापूर  : दक्षिण महाराष्ट्रात पावसाने...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे उन्हाळ...नाशिक  : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
ऊसतोड कामगारांच्या रोजगारावर होणार...नगर ः गतवर्षी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले....
वऱ्हाडातील प्रकल्प तुडुंबअकोला  ः गेल्या महिन्यात सतत झालेल्या...
नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांवर धाडीनाशिक  : देशभरात कांद्याचा साठा संपुष्टात...
पीक व्यवस्थापन सल्ला सध्या मोठ्या प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दरातही...नागपूर ः येथील कळमणा बाजार समितीत नव्या सोयाबीनची...
जळगाव बाजारात केळीची आवक रखडतजळगाव ः जिल्ह्यात केळीची आवक रखडतच सुरू असून,...