पुणे विभागात पाणीटंचाईमुळे चारापिकांच्या क्षेत्रात घट
पुणे विभागात पाणीटंचाईमुळे चारापिकांच्या क्षेत्रात घट

पुणे विभागात पाणीटंचाईमुळे चारापिकांच्या क्षेत्रात घट

पुणे ः रब्बी हंगामात पाणीटंचाईने डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. त्याचा परिणाम चारापिकांच्या लागवडीवर झाला. सध्या पुणे विभागात अवघ्या ८९ हजार ३३४ हेक्टरवर चारापिके असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, उन्हाळ्यात जनांवरासाठी चाऱ्याचा मोठा प्रश्न उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात याच कालावधीत एक लाखाहून अधिक क्षेत्रावर लागवड झाली होती. त्या तुलनेत यंदा सुमारे अकरा हजार हेक्टरने घट झाल्याचे स्पष्ट झाले. 

यंदा कमी पाऊस झाल्याने जमिनीत पुरेशा प्रमाणात ओल झाली नाही. त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर झाला असून, चारापिकांच्या क्षेत्रातही घट झाली आहे. दरवर्षी पुणे विभागात एक लाखाहून अधिक क्षेत्रावर मका, कडवळ, लुसर्नग्रास, नेपिअरग्रास, बाजरी अशा विविध चारापिकांची लागवड होत होती. 

लागवडीनंतर साधारणपणे दोन ते तीन महिन्यांनंतर चाऱ्यांचे उत्पादन होते. काही शेतकरी उत्पादन झालेला चारा वाळवून तो टप्प्याटप्प्याने वापरतात. त्यामुळे उन्हाळ्यात चाराटंचाई कमी होण्यास मदत होत होती. चालू वर्षी कमी झालेल्या लागवडीमुळे उत्पादनात चांगलीच घट होण्याचा अंदाज असून, चाराटंचाईमुळे आत्तापासून शेतकरी जनावरे विकू लागल्याचे चित्र आहे.

यंदा नगर जिल्ह्यात ३७ हजार ८३० हेक्टरवर चारापिकांची लागवड झाली. यामध्ये नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता या तालुक्यांत बऱ्यापैकी चारापिकांची लागवड झाली आहे. मात्र, जामखेड, शेवगाव, अकोलेत अत्यंत कमी क्षेत्रावर चारापिकांची लागवड झाली आहे. 

पुणे जिल्ह्यातही अवघ्या २९ हजार ४१० हेक्टरवर चारापिकांची लागवड झाली. यामध्ये हवेली, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौड या तालुक्यांत अल्प क्षेत्रावर लागवड झाली आहे. मुळशी, भोर, मावळ, वेल्हे, पुरंदर तालुक्यात थोड्या क्षेत्रावर लागवड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात कमी क्षेत्रावर चारापिकांची लागवड झाली आहे. जिल्ह्यात अवघ्या २२ हजार ४१० हेक्टरवर लागवड झाली. जिल्ह्यात दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, कमी क्षेत्रावर लागवड, तर उत्तर सोलापूरमध्ये ५४०, बार्शी ३५०, मंगळवेढा ६८० हेक्टरवर लागवड झाली आहे.

पीकनिहाय चारापिकांची झालेली लागवड हेक्टरमध्ये ः 
पीक  झालेली लागवड 
मका ३१९८०
कडवळ १९५९०
बाजरी ७९०
लुसर्नग्रास १२१७०
नेपिअर ३१८०
इतर चारापिके  २१९५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com