डुकरेमळा - मुक्ताई ओढ्याचे पाचही बंधारे तुडुंब भरले

डुकरेमळा - मुक्ताई ओढ्याचे पाचही बंधारे तुडुंब भरले
डुकरेमळा - मुक्ताई ओढ्याचे पाचही बंधारे तुडुंब भरले

आळेफाटा, जि. पुणे : पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून डुकरेमळा - मुक्ताई ओढ्याचे खोलीकरणाचे काम करण्यात आले आहे. शनिवारी (ता. ३) मीना शाखा कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ओढ्यावर बांधलेले पाचही मातीचे बंधारे तुडुंब भरले आहेत. ग्रामस्थांनी उत्साहात पाणीपूजन केले. या गावाचा सकाळ-ऍग्रोवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्पात समावेश आहे.

ओढा खोलीकरणाच्या कामासाठी सकाळ रिलीफ फंडाने दोन लाख रुपयांचा निधी दिला होता. तनिष्काच्या सदस्यांनी ओढा खोलीकरणासाठी निधीची मागणी केली होती. दरम्यान, पाणी पूजनप्रसंगी सरपंच लताताई चव्हाण, उपसरपंच रामदास तट्टू, संभाजी चव्हाण, सचिन डुकरे, तुकाराम चव्हाण, सागर डुकरे, पांडुरंग डुकरे, संतोष डुकरे, ग्रामसेवक सचिन बनकर, मंदार जाधव, सुभाष झिंजाड, शरद डुकरे आदी उपस्थित होते.

या ठिकाणी ओढा खोलीकरणाबरोबरच लोकसहभागातून परिसरातील शिवडीमळा, तट्टूमळा, नेहरमळा, पाचूरमळा, रसाळमळा (सोनेमाळ रस्ता) आदी वस्त्यांवरील विविध रस्त्यांची दुरुस्तीची कामेही करण्यात आली आहेत. याच ओढ्यावर एकूण पाच मातीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. बंधारे तुडुंब भरल्याने परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com