Agriculture news in marathi, Dummy barriers in Pune market committee | Page 3 ||| Agrowon

पुणे बाजार समितीत ‘डमी’ अडत्यांचा सुळसुळाट

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021

पुणे ः बाजार समितीच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम पुणे बाजार समितीमध्ये होत आहे. अनेक जणांनी विनापरवाना किरकोळ व्यापार थाटला आहे. यामुळे ‘डमी’ आडत्यांचा सुळसुळाट झाला आहे.

पुणे ः बाजार समितीच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम पुणे बाजार समितीमध्ये होत आहे. अनेक जणांनी विनापरवाना किरकोळ व्यापार थाटला आहे. यामुळे ‘डमी’ आडत्यांचा सुळसुळाट झाला आहे. परिणामी, घाऊक बाजार आता किरकोळ बाजार झाला आहे. याकडे प्रशासनाची हेतुतः डोळेझाक होत असल्याचे चित्र आहे.  

बाजार समितीमध्ये व्यवसाय करायचा असेल, तर गाळाधारकाला परवाना घ्यावा लागतो. मात्र सध्या अनेक आडत्यांनी स्वतःच्या गाळ्यावर आणि परवान्यावर अनेकांना भाडेतत्वावर दैनंदिन व्यवसाय करण्यास बेकायदा परवानगी दिली आहे. यामुळे घाऊक बाजार आता किरकोळ बाजार झाला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. अनेक डमी अडत्यांची गाळ्यासमोरील रस्त्यावरच किरकोळ शेतमाल विक्रीची दुकाने थाटली. त्यामुळे वाहतुककोंडीचा प्रश्‍न निर्माण झाला. 

बाजारातील अडते असोसिएशनचे पदाधिकारी, आतड्यांचे पुढारी यांच्या गाळ्यांवरच तब्बल ८ ते १० डमी विक्रेत्यांची संख्या आहे. एका विक्रेत्याकडून मुळ गाळेधारकास दररोज ५०० ते १००० रुपये दैनंदिन भाडे मिळत आहे. 

याद्वारे अनेक पारंपरिक आडत्यांनी स्वतःचा व्यवसाय बंद करून केवळ भाड्यावर अर्थार्जन सुरु केले. काही वर्षांपूर्वी शेतमालाची आवक मोठी होती. शेतमालाची तातडीने विक्री होऊन शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा, या गोंडस मागणीखाली अडते असोसिएशन प्रशासनाकडून दोन डमींना परवानगी घेतली होती. मात्र आता या परवानगीचा गैरवापर करत १०-१० डमी ठेवण्यापर्यंत मुळ परवानाधारक अडत्यांची मजल गेली.

डमी आडत्यांमुळे गाळेधारकांकडून कमी भावात शेतमाल खरेदी करून गाळ्यासमोरच चढ्या भावाने विक्री केली. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांचे देखील नुकसान होत आहे. तर निर्ढावलेले डमी अडते बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना देखील जुमानत नसल्याचे चित्र आहे. 


इतर बातम्या
नगर जिल्ह्यासाठी ५४० कोटी रुपयांचा निधी...नगर : नगर जिल्हा वार्षिक योजनेत २०२२-२३ या आर्थिक...
दळणासाठी नदीतून जीवघेणा प्रवासतळोदा, जि. नंदुरबार : सातपुड्यातील सावऱ्या दिगर...
वाळूदर येतील आवाक्यात  लिलाव कालावधी...मुंबई : राज्यात वाळूचा मुबलक पुरवठा आणि दरांमध्ये...
नगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवडनगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला...
लासलगाव स्टेशनवर किसान रेल्वेच्या ...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा,...
औरंगाबादच्या ३८५ कोटींच्या प्रारूप...औरंगाबाद : कोविड, महसुलात घट आदींमुळे जिल्ह्याला...
मराठवाड्यात केशर आंबा लागवडीस वाव : डॉ...औरंगाबाद ः ‘‘केशर आंबा, लागवडीस मराठवाड्यात वाव...
खोडवा उसात पंचसूत्री महत्त्वाची : डॉ....केज, जि. बीड : ‘‘खोडवा उसाची योग्य जोपासना...
हिंगोलीचा वार्षिक योजनेचा आराखडा १७०...हिंगोली ः औरंगाबाद येथे शुक्रवारी (ता.२१) आयोजित...
सिंधुदुर्गात पशुसंवर्धनाच्या २.१९ कोटी...सिंधुदुर्गातनगरी ः विविध १६ योजनांचा समावेश...
सोलापूर: उजनीतून रब्बीसाठी एक, उन्हाळी ...सोलापूर ः उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी एक तर...
बुलडाणा: नारी शक्ती पुरस्कारासाठी ३०...बुलडाणा : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास...
सांगली जिल्हा बॅंकेचा बड्या...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बड्या...
पाणीपुरवठ्याचे थकीत देयक भरल्यास अर्धा...वाशीम ः ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा...
नांदेड जिल्ह्यात अनुदानावर भुईमुगाचे...नांदेड जिल्ह्यात : उन्हाळी हंगाम २०२१-२२ साठी...
खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू जळगाव : खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू झाला आहे...
नाशिक विभागाला ३४६ कोटींचा वाढीव निधी...नाशिक : सन २०२२-२३ साठी नाशिक विभागाला जिल्हा...
नगर विभागात ऊसगाळपात यंदाही खासगी साखर...नगर, ः नगर जिल्ह्यात यंदा सतरा सहकारी व नऊ खासगी...
नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा नागपूर ः अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या...
कृषी वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र...अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील...