जनावरांची दूध देण्याची क्षमता ही प्रामुख्याने जनावरांच्या जाती, प्रजाती, आनुवांशिकता, वेत
ताज्या घडामोडी
युतीच्या काळात राज्य पिछाडीवर गेले ः पवार
अकोला ः युतीच्या काळात राज्य सर्वच क्षेत्रांत पिछाडीवर गेले आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या, केवळ ३१ टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळाली. बेरोजगारी वाढली, उद्योगधंदे उभे न राहल्याने रोजगाराच्या संधीच निर्माण झाल्या नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. राजकारणात नवी पिढी आणायची आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी श्री. पवार यांनी बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे बुधवारी (ता. ९) सभा घेत विदर्भातील प्रचाराचा नारळ फोडला. या वेळी श्री. पवार म्हणाले, की सैनिकांच्या शौर्याचा वापर आजवर कोणत्याही सरकारने निवडणुका जिंकण्यासाठी केला नाही. दिल्लीत बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘घर में घुसकर मारेंगे’ असे म्हणतात. मोदी हे स्वतः दिल्लीत बसून शत्रूला मारणार का, असा सवाल त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे विरोधी बाकावर बसताना कायम हमीभाव, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कळकळीने बोलायचे. आता सत्तेत आल्यावर त्यांचा कळवळा कुठे गेला, असा सवाल त्यांनी केला.
मोदी सरकारच्या काळात देशात बेरोजगारी वाढली. जेट एअरवेज बंद पडली. २० हजार जणांचा रोजगार गेला. सरकारने नोटाबंदी करून लोकांना बँकांच्या दारात उभे केले. यामध्ये १०० पेक्षा अधिक जणांचे जीव गेले होते. अद्यापही नोटाबंदीच्या झटक्यातून देश सावरलेला नाही. हे बदलण्यासाठी महाआघाडीच्या उमेदवारांना विजयी करून नवे सरकार आणावे, असे आवाहन त्यांनी केले.
- 1 of 585
- ››