Agriculture news in marathi; During the alliance, the state went backward: Pawar | Agrowon

युतीच्या काळात राज्य पिछाडीवर गेले ः पवार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

अकोला  ः युतीच्या काळात राज्य सर्वच क्षेत्रांत पिछाडीवर गेले आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या, केवळ ३१ टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळाली. बेरोजगारी वाढली, उद्योगधंदे उभे न राहल्याने रोजगाराच्या संधीच निर्माण झाल्या नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. राजकारणात नवी पिढी आणायची आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. 

अकोला  ः युतीच्या काळात राज्य सर्वच क्षेत्रांत पिछाडीवर गेले आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या, केवळ ३१ टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळाली. बेरोजगारी वाढली, उद्योगधंदे उभे न राहल्याने रोजगाराच्या संधीच निर्माण झाल्या नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. राजकारणात नवी पिढी आणायची आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. 

महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी श्री. पवार यांनी बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे बुधवारी (ता. ९) सभा घेत विदर्भातील प्रचाराचा नारळ फोडला. या वेळी श्री. पवार म्हणाले, की सैनिकांच्या शौर्याचा वापर आजवर कोणत्याही सरकारने निवडणुका जिंकण्यासाठी केला नाही. दिल्लीत बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘घर में घुसकर मारेंगे’ असे म्हणतात. मोदी हे स्वतः दिल्लीत बसून शत्रूला मारणार का, असा सवाल त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे विरोधी बाकावर बसताना कायम हमीभाव, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कळकळीने बोलायचे. आता सत्तेत आल्यावर त्यांचा कळवळा कुठे गेला, असा सवाल त्यांनी केला.

मोदी सरकारच्या काळात देशात बेरोजगारी वाढली. जेट एअरवेज बंद पडली. २० हजार जणांचा रोजगार गेला. सरकारने नोटाबंदी करून लोकांना बँकांच्या दारात उभे केले. यामध्ये १०० पेक्षा अधिक जणांचे जीव गेले होते. अद्यापही नोटाबंदीच्या झटक्यातून देश सावरलेला नाही. हे बदलण्यासाठी महाआघाडीच्या उमेदवारांना विजयी करून नवे सरकार आणावे, असे आवाहन त्यांनी केले.


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...