सांगलीत पावसाळ्यातही तलाव कोरडे

पावसाळ्यातही तलाव ठणठणीत
पावसाळ्यातही तलाव ठणठणीत

सांगली ः ऐन पावसाळ्यात तालुक्‍यातील बहुतांश तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. साठवण क्षमतेच्या जेमतेम चार टक्‍के मृतसंचय पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे तलावातील पाण्यावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना घरघर लागली आहे.

तालुक्‍यात १४ ल. पा. तलाव आहेत. पैकी दहा तलावांत टेंभूचे पाणी आले आहे. हे सर्व तलावांतील पाण्याने मृतसंचय पातळी तळ गाठला आहे. बहुतांश तलाव कोरडे पडण्यात जमा आहेत. या पाण्याचा पिण्यासाठी पाणीपुरवठा करता येत नाही. यात आटपाडी तलावावर आटपाडी, मापटेमळा, माडगुळे, कचरेवस्ती तलावावर तडवळे- बनपुरी, पाच गावची शेटफळे प्रादेशिक आणि मिटकी, घाणंदवर खरसुंडी, घरनिकी, वलवण आणि घाणंद योजना, जांभूळणी तलावावर पडळकरवाडी आणि पारेकरवाडी योजना, निंबवडेवर निंबवडे, गळवेवाडी, पुजारवाडी, माळेवस्ती तलावावर नेलकरंजी, अर्जुनवाडी तलावावर गोमेवाडी, कानकात्रेवाडी आणि बाळेवाडी योजना आणि झरे तलावावर झरे योजना अवलंबून आहेत. या तलावातील पाण्याने १ लाख २९ हजार लोकांची तहान भागविली जाते.

टॅंकरची मागणी केलेली गावे विभूतवाडी, कुरूंदवाडी, मुढेवाडी, तडवळे, पिंपरी ब्रुदुक, पुजारवाडी (दि), झरे, विठलापूर, आंबेवाडी.

उपसा बंदीला केराची टोपली पिण्याचा पाणीपुरवठा तलाव कोरडे पडत असताना महसूल प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतली. राखीव पाणीसाठा पातळी झाल्यावर उपसा बंदी लागू करण्याची आणि मोटारीचे कनेक्‍शन तोडण्याच्या कारवाईची गरज होती. ती केली नसल्यामुळे आज भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

तलाव क्षमता (द.ल.घ.फू.) सध्याचा साठा (द.ल.घ.फू.)
आटपाडी ३०८.९७ ४.००
कचरेवस्ती ११०.४० ३.००
जांभूळणी १०९.२० कोरडा
घाणंद ५०.९३ ८.००
निंबवडे २३५.१५ १.५०
शेटफळे ५१.९३ कोरडा
माळेवस्ती ६६.३० १५.००
अर्जुनवाडी ८३.२१ ३.००
बनपुरी ४७.४९ ५.००
झरे १.०० -
एकूण १२८०.२२ ४०.००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com