agriculture news in marathi, dusra celebrate in jejuri, pune, maharashtra | Page 2 ||| Agrowon

जेजुरीत १७ तास रंगला मर्दानी दसरा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

जेजुरी,जि. पुणे  ः सनई-चौघड्याचा मंगलमय सूर, फटाक्‍यांची आतषबाजी, शोभेच्या दारूचा लख्ख उजेड व भंडाऱ्याची उधळण, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात जेजुरीत मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता  श्री खंडोबाच्या दोन्ही पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला. कडेपठारच्या डोंगररांगांना जागविणाऱ्या या मर्दानी दसरा उत्सवाची सतरा तासांनंतर सांगता झाली. 

जेजुरी,जि. पुणे  ः सनई-चौघड्याचा मंगलमय सूर, फटाक्‍यांची आतषबाजी, शोभेच्या दारूचा लख्ख उजेड व भंडाऱ्याची उधळण, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात जेजुरीत मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता  श्री खंडोबाच्या दोन्ही पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला. कडेपठारच्या डोंगररांगांना जागविणाऱ्या या मर्दानी दसरा उत्सवाची सतरा तासांनंतर सांगता झाली. 

जेजुरीचा दसरा उत्सव मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सुरू झाला व बुधवारी सकाळी अकरा वाजता गडावर तलवार उचलण्याच्या स्पर्धेनंतर संपला. सायंकाळी सहा वाजता पेशव्यांनी इशारा देताच पालखी सोहळा सुरू झाला. भाविकांनी सज्जावरून पोत्याने पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली. पालखी मुख्यद्वारातून रमणा परिसराकडे मार्गस्थ झाली. या वेळी देवसंस्थानचे मुख्य विश्‍वस्त ॲड. अशोक संकपाळ, विश्‍वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, तुषार सहाणे, ॲड. प्रसाद शिंदे, खांदेकरी मानकरी मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे आदी उपस्थित होते.

कडेपठारावरील खंडोबाचा पालखी सोहळा रात्री नऊ वाजता सुरू झाला. सुसरटिंगीवरून दोन्ही पालख्या दिसल्यानंतर रमणाकडे दोन्ही पालख्या मार्गस्थ झाल्या. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कडेपठारच्या डोंगरातील रमणा परिसरात आरशामध्ये दोन्ही पालख्यांची भेटाभेट झाली. त्या वेळी फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर गडावरची पालखी जुनी जेजुरीमार्गे शहरात आली. नगरपालिकेच्या पटांगणातील रावणाचे दहन करण्यात आले. त्यानंतर नंदी चौकात धनगर समाजबांधवांनी ओव्या म्हणत लोकर उधळली.

कडेपठारच्या पालखीबरोबरच्या भाविकांना खाली उतरण्यासाठी या वेळी देवसंस्थानच्या वतीने दोर लावले होते. दोर धरून भाविक खाली उतरत होते. त्यामुळे घसरण्याचा धोका टळला. देवसंस्थानने विजेची सोय केली होती. महाद्वार रस्त्यावर पालखीचे स्वागत करण्यासाठी ग्रामस्थांनी रांगोळ्या काढल्या होत्या. गडावर कलावंतांनी पालखीपुढे हजेरी लावली. देवसंस्थानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. रोजमारा वाटून पालखी सोहळ्याची सांगता झाली. मार्तंड देवसंस्थानच्या वतीने मानकऱ्यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला.

पालखी गडावर आल्यानंतर तलवार उचलण्याची स्पर्धा घेण्यात आली. एका हाताने तलवार उचलून धरणे व कसरत, अशा दोन प्रकारच्या स्पर्धा होत्या. एकूण ४६ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. माजी विश्‍वस्त सुधीर गोडसे, सोमनाथ उबाळे, कृष्णा कुदळे व जालिंदर खोमणे यांनी पंच म्हणून काम पाहिले. दोन्ही प्रकारांतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे एकवीस हजार, पंधरा हजार व अकरा हजार; तर उत्तेजनार्थसाठी प्रत्येकी पाच हजार व गौरवचिन्हे देऊन सन्मान करण्यात आला.

तलवार स्पर्धेत शेरे, कुदळे प्रथम
एका हाताने तलवार उचलून धरण्याच्या स्पर्धेत रमेश दत्तात्रेय शेरे (१७ मिनीट १३ सेकंद) यांनी प्रथम, मंगेश चव्हाण ( ५ मिनीट ३८ सेकंद) याने द्वितीय; तर हेमंत माने (५ मिनीट ३० सेकंद) याने तृतीय क्रमांक मिळविला. अक्षय खोमणे (२ मिनीट ५४ सेकंद) व विजय कामथे (२ मिनीट ३१ सेकंद) यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. तलवार कसरतीच्या स्पर्धेमध्ये सचिन शिवाजी कुदळे, शिवाजी माणिक राणे व नितीन शिवाजी कुदळे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले. विशाल माने व अक्षय गोडसे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

इतर बातम्या
नांदेड : पावसात भिजल्यामुळे पिकांचे...नांदेड : गेल्या आठवड्यात नांदेड, परभणी, हिंगोली...
मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी...अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक...
खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः...बुलडाणा  ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून...
खारपाण पट्ट्यात रब्बीत हजार हेक्टरवर...अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात...
जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत...जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व...
वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार...वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक...
शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा धूसर :...‘लोकांच्या डोळ्यांवर धर्मांधतेची झापड चढविण्यात...
वीजग्राहकांच्या समस्यांबाबत भूमिका...मुंबई ः राज्यातील महावितरण कंपनीच्या...
सोलापुरातील ६९५ दूध संस्थांना नोटिसासोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला दूध...
एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत...नाशिक  : प्रलंबित वेतन करारासह इतर...
आटपाडी तालुका पाऊस, ‘टेंभू’मुळे पाणीदारसांगली : आटपाडी तालुक्यात टेंभूच्या योजनेचे...
सांगलीतील निवडणूक प्रचारात शेती प्रश्‍न...सांगली: विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगू...
कर्जफेडीची क्षमता देणाऱ्या धोरणांची गरजविधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राजकीय...
महामंडळाने ‘उद्योग’ बंद केले तरच विकासराज्यातील कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी ‘...
हजारो नाशिककरांनी चाखली रानभाज्यांची चवनाशिक : आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या विषमुक्त...
`मी काय केले, हे विचारणाऱ्या अमित...कन्नड जि. औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी व...
नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर...नाशिक : जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
जालन्यात मूग खरेदी केंद्रांकडे...जालना : हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी जिल्ह्यात...
नवरात्रोत्सवात पुणे बाजारसमितीत फुलांची...पुणे  ः नवरात्र आणि दसऱ्याला पुणे बाजार...
वैविध्यपूर्ण विचारांनी विद्यार्थी...परभणी : ‘‘विद्यार्थ्‍यांची सांस्‍कृतिक, भाषिक व...