बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (कनेक्शन कट) कारवाई करण्याचा इशारा महावितरणने राज्
ताज्या घडामोडी
आघाडीने चारली भाजपला धूळ
महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या विधान परिषद, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पहिल्याच निवडणुकीत आघाडीने भाजपला धूळ चारली आहे.
पुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या विधान परिषद, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पहिल्याच निवडणुकीत आघाडीने भाजपला धूळ चारली आहे.
पुणे, औरंगाबाद आणि नागपूर विभागांत झालेल्या ६ जागांपैकी ३ ठिकाणी महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळविला आहे. तर अमरावतीमध्ये किरण सरनाईक यांच्या विजयाची औपचारिकता बाकी होती. तसेच धुळे-नंदुरबारच्या केवळ एका जागेवर अमरिश पटेल यांच्या माध्यमातून भाजपचा विजय झाला असून, या निवडणुकीत पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघांतील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. भारतीय जनता पक्षासाठी अतिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड ४८ हजार ८२४ मतांची विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या संग्राम देशमुख यांचा पराभव केला. लाड यांना १ लाख २२ हजार १४५, तर देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते मिळाली. देशमुख यांचा पराभव भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि दोन वेळा या मतदारसंघातून विजयी झालेले चंद्रकांत पाटील यांना हा धक्का आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी जिंकली आहे. सलग तीनवेळा विजयी होण्याचा विक्रम श्री. चव्हाण यांनी केला आहे. या मतदारसंघात हॅटट्रिक करणारे महाविकास आघाडीचे चव्हाण हे पहिलेच ठरले आहेत. चव्हाण यांनी भाजपचे शिरीश बोराळकर यांच्यावर तब्बल ५७ हजार ८९५ मतांच्या विक्रमी आघाडीने विजय मिळवला. चव्हाण यांना १ लाख १६ हजार ६३८, तर बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मते मिळाली.
नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी कॉंग्रेसने भाजपच्या गडाला सुरुंग लावत विजयी पताका फडकविली. महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा १८ हजार ९१० मतांनी पराभव केला. ॲड. वंजारी यांना ६१ हजार ७०१ तर भाजपचे संदीप जोशी यांना ४२ हजार ७९१ मते मिळाली. शिक्षक मतदारसंघात पुणे महाविकास आघाडीचे (काँग्रेस) जयंत आसगावर विजयी झाले. तर अमरावती मतदार संघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयाच्या उंबरठ्यावर होते. सरनाईक आणि शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांच्यामध्ये चुरस रंगली होती.
पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या पदवीधर मतदारसंघांत तीनही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये पुणे आणि औरंगाबाद मध्ये राष्ट्रवादीचे अनुक्रमे अरुण लाड आणि सतीश चव्हाण तर नागपूरमधून काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत. धुळे, नंदुरबार मतदारसंघातील विधान परिषदेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल हे विजयी झाले आहेत.
- 1 of 1025
- ››