धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’ काळवंडले 

कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील अमरावती-जबलपूर मार्गाचे संथ गतीने सुरू असलेले सिमेंटीकरण आणि परिसरातील समृद्धी महामार्गाच्या बांधकामादरम्यान वाहतुकीमुळे धूळ उडत आहे.
The dust turned the farmers 'white gold' black
The dust turned the farmers 'white gold' black

गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील अमरावती-जबलपूर मार्गाचे संथ गतीने सुरू असलेले सिमेंटीकरण आणि परिसरातील समृद्धी महामार्गाच्या बांधकामादरम्यान वाहतुकीमुळे धूळ उडत आहे. धुळीमुळे रस्त्याशेजारील शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाचे पीक काळवंडले आहे. त्यामुळे मार्गालगतच्या शेतकऱ्यांना या नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.  यंदा पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेतात घातलेल्या बियाण्यांची किंमत सुद्धा न निघाल्याने या भागातील बळिराजा आर्थिक संकटात अडकला आहे. तर मार्गालगतच्या शेतकऱ्यांना धुळीमुळे या नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. अमरावती-जबलपूर मार्ग निर्माण काळापासून समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. बांधकाम विभागाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका वाहनचालकासह आता शेतकऱ्यांच्या जिवावर उठला आहे. बांधकामाचा वेग कमी असल्याने व योग्य नियोजन नसल्याने अनेक समस्या उत्पन्न होत आहेत. शेतीमालावर सर्वत्र धुळीचे लेप चढले आहेत. काढणीला आलेल्या कापसाचे बेहाल झाले आहे. धुळीमुळे कापसाचा दर्जा खालावत असून, या पिकांचा उत्पादनखर्च भरून निघण्याची शक्यता मावळल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. वर्षभराचा शेती, घर व इतर खर्च भागवायचा कसा, ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.  अपघाताचे सत्र सुरूच  परिसरातून जाणारा अमरावती-जबलपूर महामार्गाच्या सिमेंटीकरणाच्या बांधकामाचा वेग संथ असल्याने व योग्य नियोजन नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी प्रकाशाची कोणतीही व्यवस्था नसल्याने वाहन चालवितांना संतुलन बिघडून अपघात होत आहेत.  कापसाचा भाव पडतोय  बांधकामादरम्यान रस्त्यावरील धुळीने पांढरे सोने पूर्णतः काळवंडल्यामुळे कापूस वेचणी करायला मजूर मिळत नसल्याची सध्या स्थिती आहे. आसमानी संकटानंतर आता धुळीमुळे या भागातील ‘पांढरे सोने’ काळवंडले असल्याने बाजारभावापेक्षा क्विंटलमागे कमी भाव मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com