Agriculture News in Marathi The dust turned the farmers 'white gold' black | Page 3 ||| Agrowon

धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’ काळवंडले 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील अमरावती-जबलपूर मार्गाचे संथ गतीने सुरू असलेले सिमेंटीकरण आणि परिसरातील समृद्धी महामार्गाच्या बांधकामादरम्यान वाहतुकीमुळे धूळ उडत आहे.

गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील अमरावती-जबलपूर मार्गाचे संथ गतीने सुरू असलेले सिमेंटीकरण आणि परिसरातील समृद्धी महामार्गाच्या बांधकामादरम्यान वाहतुकीमुळे धूळ उडत आहे. धुळीमुळे रस्त्याशेजारील शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाचे पीक काळवंडले आहे. त्यामुळे मार्गालगतच्या शेतकऱ्यांना या नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. 

यंदा पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेतात घातलेल्या बियाण्यांची किंमत सुद्धा न निघाल्याने या भागातील बळिराजा आर्थिक संकटात अडकला आहे. तर मार्गालगतच्या शेतकऱ्यांना धुळीमुळे या नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. अमरावती-जबलपूर मार्ग निर्माण काळापासून समस्यांच्या गर्तेत अडकला आहे.

बांधकाम विभागाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका वाहनचालकासह आता शेतकऱ्यांच्या जिवावर उठला आहे. बांधकामाचा वेग कमी असल्याने व योग्य नियोजन नसल्याने अनेक समस्या उत्पन्न होत आहेत. शेतीमालावर सर्वत्र धुळीचे लेप चढले आहेत. काढणीला आलेल्या कापसाचे बेहाल झाले आहे. धुळीमुळे कापसाचा दर्जा खालावत असून, या पिकांचा उत्पादनखर्च भरून निघण्याची शक्यता मावळल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. वर्षभराचा शेती, घर व इतर खर्च भागवायचा कसा, ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. 

अपघाताचे सत्र सुरूच 
परिसरातून जाणारा अमरावती-जबलपूर महामार्गाच्या सिमेंटीकरणाच्या बांधकामाचा वेग संथ असल्याने व योग्य नियोजन नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी प्रकाशाची कोणतीही व्यवस्था नसल्याने वाहन चालवितांना संतुलन बिघडून अपघात होत आहेत. 

कापसाचा भाव पडतोय 
बांधकामादरम्यान रस्त्यावरील धुळीने पांढरे सोने पूर्णतः काळवंडल्यामुळे कापूस वेचणी करायला मजूर मिळत नसल्याची सध्या स्थिती आहे. आसमानी संकटानंतर आता धुळीमुळे या भागातील ‘पांढरे सोने’ काळवंडले असल्याने बाजारभावापेक्षा क्विंटलमागे कमी भाव मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. 


इतर बातम्या
दळणासाठी नदीतून जीवघेणा प्रवासतळोदा, जि. नंदुरबार : सातपुड्यातील सावऱ्या दिगर...
वाळूदर येतील आवाक्यात  लिलाव कालावधी...मुंबई : राज्यात वाळूचा मुबलक पुरवठा आणि दरांमध्ये...
नगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवडनगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला...
लासलगाव स्टेशनवर किसान रेल्वेच्या ...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा,...
औरंगाबादच्या ३८५ कोटींच्या प्रारूप...औरंगाबाद : कोविड, महसुलात घट आदींमुळे जिल्ह्याला...
मराठवाड्यात केशर आंबा लागवडीस वाव : डॉ...औरंगाबाद ः ‘‘केशर आंबा, लागवडीस मराठवाड्यात वाव...
खोडवा उसात पंचसूत्री महत्त्वाची : डॉ....केज, जि. बीड : ‘‘खोडवा उसाची योग्य जोपासना...
हिंगोलीचा वार्षिक योजनेचा आराखडा १७०...हिंगोली ः औरंगाबाद येथे शुक्रवारी (ता.२१) आयोजित...
सिंधुदुर्गात पशुसंवर्धनाच्या २.१९ कोटी...सिंधुदुर्गातनगरी ः विविध १६ योजनांचा समावेश...
सोलापूर: उजनीतून रब्बीसाठी एक, उन्हाळी ...सोलापूर ः उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी एक तर...
बुलडाणा: नारी शक्ती पुरस्कारासाठी ३०...बुलडाणा : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास...
सांगली जिल्हा बॅंकेचा बड्या...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बड्या...
पाणीपुरवठ्याचे थकीत देयक भरल्यास अर्धा...वाशीम ः ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा...
नांदेड जिल्ह्यात अनुदानावर भुईमुगाचे...नांदेड जिल्ह्यात : उन्हाळी हंगाम २०२१-२२ साठी...
खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू जळगाव : खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू झाला आहे...
नाशिक विभागाला ३४६ कोटींचा वाढीव निधी...नाशिक : सन २०२२-२३ साठी नाशिक विभागाला जिल्हा...
नगर विभागात ऊसगाळपात यंदाही खासगी साखर...नगर, ः नगर जिल्ह्यात यंदा सतरा सहकारी व नऊ खासगी...
नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा नागपूर ः अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या...
कृषी वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र...अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील...
अचलपूर तालुक्यातील तीन कृषी...अमरावती : खत वितरणात अनियमितता निदर्शनास आल्याने...