‘द्वारकाधीश’कडून होणार सहा लाख टन गाळप

देऊर ता. जि. धुळे : ऊस हे शाश्वत पीक आहे. नैसर्गिक संकट टाळण्यासाठी ऊस लागवड योग्य आहे. शेवरे (ता.बागलाण) येथील द्वारकाधीश साखर कारखानातर्फे ऊस विकास योजनेतर्गंत शेतकऱ्यांना सम प्रमाणात सवलती, मदत दिली जात आहे.
 Dwarkadhish will grind six lakh tonnes
Dwarkadhish will grind six lakh tonnes

देऊर ता. जि. धुळे : ‘‘ऊस हे शाश्वत पीक आहे. नैसर्गिक संकट टाळण्यासाठी ऊस लागवड योग्य आहे. शेवरे (ता.बागलाण) येथील द्वारकाधीश साखर कारखानातर्फे ऊस विकास योजनेतर्गंत शेतकऱ्यांना सम प्रमाणात सवलती, मदत दिली जात आहे. साक्री, कळवण, नवापूर, निफाड, चाळीसगाव, शिरपूर तालुक्यातून ऊस गाळपासाठी येत आहे. सहा लाख टनांचे गाळप करण्याचे नियोजन आहे’’, असे द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी सांगितले. 

नेर (ता.धुळे ) येथे ऊस विकास व खरेदी केंद्र गट कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच नेरचे प्रगतिशील शेतकरी तुकाराम माळी, देऊरचे बाबाजी देवरे यांच्या हस्ते झाले. देऊरचे काळू देवरे, किशोर देवरे, अमर देसले, चुडामण महाले, भाऊसाहेब देवरे, आबा शेवाळे, जगदीश खैरनार, नेरचे दीपक खलाणे, शरद खलाणे, बापू मळी,आनंदखेडेचे रोहिदास कदम आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना दै. ‘अॅग्रोवन’चे वाटप

अध्यक्ष सावंत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ‘अॅग्रोवन’मध्ये २१ नोव्हेंबर रोजी  ''ऊस उत्पादकांनो समजून घ्या, एफआरपीचे गणित'' या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचे कात्रण जनजागृतीसाठी वाटप केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com