agriculture news in Marathi e-chawadi got response in lockdown Maharashtra | Agrowon

लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 जून 2020

​एरवी सरकारी कामकाजाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी असतात. मात्र, राज्यातील तलाठ्यांनी लॉकडाउन काळात ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना यशस्वी करून दाखवली. यामुळे शेतकऱ्यांची सोय झालीच पण राज्य शासनाला महसुल देखील मिळाला आहे. कार्यालयीन कामकाजाचे तंत्र जगभर बदलते आहे. या तंत्राला आत्मसात करण्यात महसुल विभाग पुढाकार घेतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात घर बसल्या जलद व चांगल्या सुविधा मिळतील.
– रामदास जगताप, राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प

पुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या ई-चावडीतून लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक कामे झाली आहेत. तलाठ्यांनी ४२ लाख सातबारा वाटले, अशी माहिती महसुल विभागाच्या सूत्रांनी दिली. 

 विशेष म्हणजे डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा वाटणारे संकेतस्थळ आता स्वतंत्र क्लाउडवर गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता नव्या लिंकवर जावून सातबारा मिळवावा लागेल. https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR या संकेतस्थळाला भेट देवून विविध सुविधा घेवू शकतात.
महाभूमी पोर्टलने डिजिटल स्वाक्षरीत सातबारा देण्यासाठी गेल्या वर्षीपासून ‘आपला अभिलेख’ नावाचे संकेतस्थळ सुरू केले होते. आता त्यात बदल करून जीसीसी क्लाउडवर नवी लिंक आणली गेली आहे. या संकेतस्थळाच्या नावात ‘डिजिटल सातबारा’ असा शब्द वापरण्यात आला आहे.  

जुन्या संकेतस्थळावरील सर्व नोंदणीकृत वापरकर्ते मात्र आधीच्याच लॉगिन आयडी व पासवर्डचा वापर करून वॅलेट खात्यातील शिल्लक रक्कम वापरू शकतात. त्या रकमेतून नवे डिजिटल सातबारा उतारे मिळवू शकतात. दरम्यान, सातबारा कामकाज ऑनलाइन केल्यामुळे तलाठ्यांना लॉकडाऊनच्या काळात चांगली सेवा देता आली, असा दावा महसुल विभागाने केला आहे. लॉकडाउन कालावधीत राज्यात सरासरी रोज तीन हजार तलाठी ऑनलाइनवर होते. 

‘‘लॉकडाउनमध्ये ई-चावडीचा तलाठ्यांनी उत्तमपणे वापर केला. त्यामुळेच सव्वाचार लाख ऑनलाइन फेरफार तलाठ्यांनी घेतले. ई-चावडीत या कालावधीत तलाठ्यांनी ४२ लाख सातबारा उतारे तर २० लाख खाते उतारे वाटले. दोन लाख फेरफार उतारे देखील दिले.याच कालावधीत महाभूमी पोर्टलवरून सव्वा तीन लाख डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उतारे डाऊनलोड केले गेले,’’ अशी माहिती महसुल विभागाच्या सूत्रांनी दिली.
 


इतर अॅग्रो विशेष
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात...सोलापूर ः  आषाढी यात्रेच्या कालावधीसाठी श्री...
बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेचा कारभार...नागपूर ः ‘शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे...
राज्यात पावसाचा कमी अधिक जोर पुणे : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वादळी...पुणे : कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा मुसळधार पाऊस...
‘रायरेश्‍वर ’ गटाचा; सेंद्रिय हळदीचा...नाटंबी (ता. भोर, जि. पुणे ) येथील श्री. रायरेश्वर...
दुग्धप्रक्रिया उद्योगातून कमावला...सांगली येथील माळी कुटुंबीय गेल्या काही...
ग्लायफोसेटच्या थेट वापरावर बंदीच्या...पुणे: अलीकडील वर्षांत सातत्याने चर्चेत असलेल्या...
कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा...नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतमाल काढणीपश्‍चात...
अजून एक `लातूर पॅटर्न’कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर एप्रिल, मे, जून...
सत्त्वयुक्त उत्पादनांची हवी कृषी...माणसाच्या उपभोगासाठी उपयुक्त असलेली जैवविविधता...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...