Agriculture news in Marathi The 'e-claim' system for account holders | Agrowon

खातेदारांच्या नोंदीसाठी ‘ई-हक्क’ प्रणाली

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

नगर ः वारस नोंद, बोजा, गहाणखत, बोजा कमी करणे, ई-करार नोंदी, मृताचे नाव कमी करणे, विश्‍वस्तांचे नाव बदलणे आदी आठ प्रकारच्या फेरफारसाठी अर्ज करण्यासाठी खातेदाराला वारंवार तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. मात्र, आता इंडिया भूमिअभिलेखाचे आधुनिकीकरणांतर्गत ई-हक्क प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. या प्रणालीमुळे खातेदारांना वेगवेगळ्या हक्काच्या नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे तलाठ्यांच्या कामकाजात गतिमानता, पारदर्शकपणा येणार आहे. खातेदारांच्या वेळ, अनाठायी पैशांची बचत होणार आहे. 

नगर ः वारस नोंद, बोजा, गहाणखत, बोजा कमी करणे, ई-करार नोंदी, मृताचे नाव कमी करणे, विश्‍वस्तांचे नाव बदलणे आदी आठ प्रकारच्या फेरफारसाठी अर्ज करण्यासाठी खातेदाराला वारंवार तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. मात्र, आता इंडिया भूमिअभिलेखाचे आधुनिकीकरणांतर्गत ई-हक्क प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. या प्रणालीमुळे खातेदारांना वेगवेगळ्या हक्काच्या नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे तलाठ्यांच्या कामकाजात गतिमानता, पारदर्शकपणा येणार आहे. खातेदारांच्या वेळ, अनाठायी पैशांची बचत होणार आहे. 

खातेदाराला तलाठी कार्यालयाकडे सात-बारावर हक्‍काच्या नोंदी फेरफारच्या स्वरूपात घेण्यासाठी अर्ज करावे लागतात. यापुढे ते अर्ज ऑनलाइन दाखल करता येतील. प्रणालीचा वापर खातेदारांसह बॅंका, सहकारी सोसायट्या, पतसंस्थांनादेखील वापरता येईल. त्यासाठी बॅंक प्रतिनिधी, सोसायटी सचिव व खातेदार यांना hpps:// pdeigr.maharashtrs.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. 

पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, पॅन कार्ड नंबरची माहिती द्यावी लागणार आहे. ऑनलाइन अर्ज दाखल करताच खातेदाराला अर्जाच्या प्रतीसह संकेतांक क्रमांक मिळेल. त्या आधारे अर्जाची स्थितीही पाहता येणार आहे.

ई-हक्‍क प्रणालीद्वारे खातेदाराचा अर्ज तलाठ्यांना ई-फेरफारमध्ये प्राप्त करता येऊन फेरफारमध्ये रूपांतरित करता येणार आहे. ही प्रणाली ई-फेरफार प्रणालीशी संलग्न करण्यात आली आहे. प्रणालीच्या वापरामुळे तलाठ्यांच्या कामकाजात गतिमानता व पारदर्शकता येण्यास निश्‍चित मदत होणार आहे. 
- ऊर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...