Agriculture news in marathi E-crop registration in Jalgaon Difficulties in the process | Agrowon

जळगावात ई-पीक नोंदणी प्रक्रियेत अडचणी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

वावडे, जि. जळगाव : राज्य शासनाने शेतातील पीकपेरा नोंदविण्यासाठी ई-पीक पाहणी ॲप विकसित केले आहे.

वावडे, जि. जळगाव : राज्य शासनाने शेतातील पीकपेरा नोंदविण्यासाठी ई-पीक पाहणी ॲप विकसित केले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या अँड्रॉइड मोबाईल फोनवर हे ॲप डाउनलोड करून त्यावर प्रत्यक्ष फोटो अपलोड करून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले, पण अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत, यापेक्षा पूर्वीची पद्धत बरी आहे, असा सूर शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे. 

प्रत्येक गावामधील लागवडीयोग्य क्षेत्रावर कोणती पिके, किती लावलेली आहेत, याची माहिती शासनाला हवी असते. त्यातून राज्यात कोणते पीक किती आहे, याची माहिती मिळते. तसेच नाफेडला शेतीमालाची विक्री करताना किंवा एखाद्या पिकावर नैसर्गिक संकट आल्यास त्याला शासकीय लाभ देताना या पीक नोंदणीचा उपयोग होतो. आतापर्यंत सातबारावर ही नोंदणी तलाठी करत होते. आता हे ॲप आल्याने तलाठ्यांचा ताण कमी झाला; पण पीक नोंदणी करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. 

तालुक्‍यात अनेक शेतकरी अल्प अत्यल्प भूधारक आहेत. यांच्यामधील बहुतेकांना अँड्रॉइड मोबाईल नाहीत, ज्यांच्याकडे व्यवस्था आहे, त्यांना मिश्रपिकांची माहिती कशी भरावी, हे समजत नाही. जमीन क्षेत्रातील कायम पडीक क्षेत्र, शेतातील, बांधावरील झाडांची नोंदणी करतानादेखील अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. सर्व माहिती भरल्यावर माहिती व फोटो अपलोड होत नाहीत. अशा एक नव्हे अनेक अडचणी आहेत. 

अँड्रॉइड मोबाईल फोन घ्यायचा कशाने आणि त्याचा रिचार्जचा खर्चदेखील परवडत नाही. प्रचलित पद्धतीने पीक नोंदणी करावी. 
- शांताराम पाटील, शेतकरी, वावडे, ता. अमळनेर, जि. जळगाव


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...