Agriculture News in Marathi E-crop in Satara Short response to the survey | Page 3 ||| Agrowon

साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 सप्टेंबर 2021

सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस अल्प प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील १ हजार ७१५ गावांमधील ७ लाख ४४ हजार ९४२ पैकी रविवारअखेर केवळ १ लाख ४२ हजार ५१२ म्हणजे केवळ १९.१३ टक्के खातेदारांनी पाहणी केली.

सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस अल्प प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील १ हजार ७१५ गावांमधील ७ लाख ४४ हजार ९४२ पैकी रविवारअखेर केवळ १ लाख ४२ हजार ५१२ म्हणजे केवळ १९.१३ टक्के खातेदारांनी ई-पीक पाहणी केली आहे. त्यात महाबळेश्‍वर तालुका अव्वल असून, या तालुक्यातील ६ हजार ५६६ पैकी ४ हजार ६४९ म्हणजे ७०.८० टक्के खातेदारांनी नोंदणी केली आहे. सर्वांत कमी पाटण तालुक्यातील १ लाख ५७ हजार ५५१ पैकी केवळ १२ हजार ६८४ म्हणजे ८.०५ टक्के खातेदारांनी ई-पीक पाहणी केली आहे. 

ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यव्यापी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे परंपरागत पद्धतीने तलाठी स्तरावरील पीक पाहणीतील त्रुटी आणि अपूर्तता अथवा तक्रारी विचारात घेऊन आता शेतकऱ्याला स्वत:च्या शेतातील उभ्या पिकांचे फोटो काढून पीक पाहणी अपलोड करण्याचे स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एका मोबाइलवरून २० खातेदारांची पीक पाहणी अपलोड करावयाची सोय असल्याने एका वस्ती/वाडीवर काही शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन असले तरी ई-पीक पाहणी १०० टक्के होण्यास काहीही अडचण येणार नाही. ई-पीक पाहणी मोबाइल ॲप वापरण्यास अत्यंत सोपे असून, त्यासाठी सर्व खातेदार शेतकऱ्यांना गावचे तलाठी व कृषी सहायकांमार्फत मार्गदर्शन केले जाते. 

खरीप हंगाम ई-पीक पाहणी करण्यासाठीची १५ सप्टेंबर ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यास मान्यता दिली आहे आणि त्यानंतर १५ ऑक्टोबरपर्यंत तलाठी स्तरावरून पीक पाहणी करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. ई-पीक पाहणी शेतकरी करू न शकल्यास पीककर्ज, पीकविमा किंवा अन्य शासकीय योजना यांचा लाभ मिळणार नाही, असा निर्णय अद्याप शासनाने घेतलेला नाही. मात्र ई-पीक पाहणीमुळे पीकविमा, पीककर्ज, तसेच शासकीय योजनांचा लाभ सुलभ होणार हे मात्र नक्की.

डिजिटल स्वाक्षरीत सात-बारा आता सर्वच योजनांसाठी जसे पंतप्रधान पीकविमा योजना, आधारभूत किमतीवरील धान/पीक खरेदी, नैसर्गिक आपत्तीमधील नुकसानभरपाई, पीक कर्जासाठी बँक पोर्टल, महाडीबीटी पोर्टल इत्यादीमुळे सात-बारावर अचूक पीक पेरा नमूद असणे शेतकरी बांधवांच्या हिताचे आहे. ई-पीक पाहणी मोबाइल ॲपमधील बहुसंख्य त्रुटीही दूर करण्यात आल्या असून, खातेदारांनी लवकरात लवकर ई-पीक पाहणी करावी, असे आवाहन शासन स्तरावरून करण्यात आले आहे. 


इतर बातम्या
शेतीमाल साठवणूक, तारण कर्ज, ब्लॉकचेनची... पुणे : राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल...
मतदार नोंदणीसाठी राज्यभरात...नागपूर : राज्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये १६...
प्रकल्पग्रस्तांचे अर्ज प्रलंबित ठेवू...अमरावती : सिंचन प्रकल्पांची निर्मिती होत असताना...
जिनिंग प्रेसिंग कारखाने खानदेशात धडधडू...जळगाव ः खानदेशात कापसावर प्रक्रिया करणारे जिनिंग...
अकोल्यातील सिंचन प्रकल्पांच्या...अकोला ः जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांची देखभाल...
सांगली जिल्ह्यातील थकबाकीमुक्तीत ५५...सांगली ः ‘‘कृषिपंपांच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
दोन लाख ९५ हजार टन खतांचे आवंटन मंजूरऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
दोन लाख ३८ हजार खातेदारांचे आधार...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले...
ग्रामबीजोत्पादनातून हरभरा, गहू...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
जुन्नर बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल...जुन्नर, जि. पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाच्या...
जळगाव जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांना...जळगाव : जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत झालेल्या...
नगर जिल्ह्यात सव्वानऊ हजार शेतकऱ्यांचे...नगर : जिल्ह्यात तब्बल दोन हजार ६३५ शेतकऱ्यांनी...
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...