ई-पीक पाहणीत एक गुंठा क्षेत्रात पीक नोंद होईना

एक गुंठा क्षेत्रात ई-पीक पाहणी अॅपद्वारे पीक पेरा नोंद होतच नसल्याचा अनुभव एका शेतकऱ्याला आला आहे. यामुळे पीक पेरा होत नसून, तलाठीदेखील पीक पेरा करण्यास असमर्थता दाखवित आहेत, असेही शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
The e-crop survey did not record crop in one goontha area
The e-crop survey did not record crop in one goontha area

जळगाव : एक गुंठा क्षेत्रात ई-पीक पाहणी अॅपद्वारे पीक पेरा नोंद होतच नसल्याचा अनुभव एका शेतकऱ्याला आला आहे. यामुळे पीक पेरा होत नसून, तलाठीदेखील पीक पेरा करण्यास असमर्थता दाखवित आहेत, असेही शेतकऱ्याचे म्हणणे आहे. 

संबंधित शेतकऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. या शेतकऱ्यानुसार ई-पीक पाहणी अॅपद्वारे ३० सप्टेंबरपर्यंत पीक पेरा नोंद करायची आहे. ही नोंद करण्यासाठी अॅप डाऊनलोड केले. दोन खाते असून, त्यांची नोंद त्यात केली. एका खात्यात पीक पेरा नोंद झाली, पण दुसरे खाते एक गुंठा पेरणीयोग्य व १७ गुंठे पोटखराब आहे. पण पोटखराब क्षेत्रदेखील झुडपे, टेकडी सपाट करून पेरणीयोग्य केले आहे. यात पेरणी केली आहे. त्याची नोंद करण्याचा प्रयत्न अॅपवर केला, पण त्यात पेरणीसाठी पुरेसे क्षेत्र नाही, अशी सूचना येत होती. तीनवेळा पीक पेरा नोंदविण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. यानंतर ही अडचण तलाठी यांना सांगितली. पीक पेरा नोंदवा, अशी विनंती केली. पण तलाठी यांनी पीक पेरा नोंद करण्यास असमर्थता दाखविली. पेरा नोंदीचे अधिकार आम्हाला पोर्टलवर मिळाले नाही, तर पीक पेरा नोंदच होवू शकणार नाही, असेही तलाठी म्हणाले.

सध्या आम्हाला पीक पेरा नोंदीचे अधिकार नाहीत. ३० सप्टेंबरनंतर पोर्टलवर आम्हाला पीक पेरा नोंदीचे अधिकार किंवा पर्याय मिळू शकतील. त्या वेळी नोंद करता येईल, पण या प्रकारात आपले शेत पडिक दिसत आहे. त्यात पेरणी केली, पण ते पडिक दिसत असल्याने पुढे पीक कर्ज, अनुदान यासंबंधी अडचणी येतील, असेही शेतकरी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com